Bangladesh : भारतात पळून येणार्या बांगलादेशाच्या माजी न्यायमूर्तींना अटक
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशाच्या(Bangladesh) सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायमूर्ती शमदुद्दीन चौधरी माणिक (Shamsuddin Chowdhury Manik) भारतात पळून जाण्याचा प्रयत्न करत असतांना त्यांना सीमेवरून अटक करण्यात आली. स्थानिक लोकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या कह्यात दिले.
माणिक यांच्याविरुद्ध मानहानीचा गुन्हा नोंदवण्यात करण्यात आला. खालिदा झिया यांचे दिवंगत पती आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे संस्थापक झियाउर रहमान यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिपणी केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. माणिक यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये एका खासगी वाहिनीवर झियाउर रहमान यांना ‘ते स्वातंत्र्यसैनिक नसून ‘रझाकार’ आहेत’, असे म्हटले होते. बांगलादेशात देशद्रोह्यांना रझाकार म्हटले जाते.