२५ ऑगस्ट या दिवशी सीबीडी येथे ‘हिंदु संमेलना’चे आयोजन
हिंदूंनी उपस्थित रहाण्याचे आवाहन
नवी मुंबई, २३ ऑगस्ट (वार्ता.) – विश्व हिंदु परिषदेच्या षष्ठ्यपूर्ती वर्षानिमित्त सीबीडी येथे हिंदु संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विश्व हिंदु परिषदेचे नवी मुंबई सहमंत्री स्वरूप पाटील यांनी दिली. सीबीडी सेक्टर ३ येथील वारकरी भवनमध्ये २५ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी ५ वाजता हे संमेलन होणार आहे. या संमेलनामध्ये पालघर येथील हिंदु शक्तीपिठाचे पू. स्वामी भारतानंद सरस्वती महाराज हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असणार आहेत.
विश्व हिंदु परिषदेच्या स्थापनेला यंदा ६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने देशभर नगर / प्रखंड स्तरावर हिंदु संमेलनांचे आयोजन करण्यात येत आहे. या संमेलनात परिसरातील सर्व संस्था, सामाजिक मंडळ, विविध भाषिक संस्था, संप्रदाय आदींचा सहभाग असणार आहे. या वेळी परिषदेच्या मागील ६० वर्षांतील कार्याचे यश आणि आज देशासह जगामध्ये ‘हिंदु समाजा समोरील आव्हाने’ याविषयी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. या संमेलनात हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन बेलापूर प्रखंड अध्यक्ष मुकेश गांधी यांनी केले आहे.