मुलीच्या आत्महत्येची चौकशी करून दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करा ! – ओमकार शुक्ल, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप सांस्कृतिक प्रकोष्ट
मिरज तालुक्यात ‘लव्ह जिहाद’ची घटना !
मिरज (जिल्हा सांगली), २३ ऑगस्ट (वार्ता.) – मिरज तालुक्यातील एका गावात ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणातून एका १८ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. धर्मांध तरुण आणि त्याचे कुटुंबीय यांच्यामुळे त्या तरुणीला आत्महत्या करावी लागली असल्याने सर्व दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी येथील भाजपचे सांस्कृतिक प्रकोष्टचे प्रदेश उपाध्यक्ष ओमकार शुक्ल यांनी पोलीस उपअधीक्षक प्रणित गिल्डा यांच्याकडे दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे, तसेच उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही मागण्यांचे निवेदन पाठवण्यात आले आहे.
या वेळी ओमकार शुक्ल, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भैय्या खाडीलकर, प्रदेश ओबीसीच्या उपाध्यक्षा ज्योती कांबळे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा अनघा कुलकर्णी, नीलेश साठे, प्राची फाटक, संतोष भोसले, सुहास सांगरोळकर, मधुमती गाडवे आणि सीमा मगदूम उपस्थित होते.
ओमकार शुक्ल यांनी निवेदनात म्हटले आहे की, ‘लव्ह जिहाद’च्या घटना या महाराष्ट्रात वारंवार घडत आहेत. या घटना थांबवण्यासाठी कठोर कायदा करणे आवश्यक आहे. हिंदु धर्मासमवेतच देशालाही ‘लव्ह जिहाद’ घातक आहे. मिरज तालुक्यातील या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब भयभीत झाले आहे. त्यांना आधार देण्याची आवश्यकता आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ शकते. यासाठी विशेष अधिवेशन बोलावून ‘लव्ह जिहाद’च्या विरुद्ध कठोर कायदा करावा, तसेच या घटनेतील दोषींची सखोल चौकशी करून मुळापर्यंत जाऊन कारवाई करावी. या वेळी पोलीस उपअधीक्षक प्रणित गिल्डा यांनी निवेदन स्वीकारून कोणतेही दडपण न ठेवता अधिकाअधिक खोलात जाऊन चौकशी करून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.