बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार ही देशातील हिंदूंसाठी धोक्याची घंटा ! – नितीन शिंदे, माजी आमदार
सांगली, २३ ऑगस्ट (वार्ता.) – बांगलादेशातील हिंदूंवर तेथील कट्टरपंथीय मुसलमान अत्याचार करत आहेत. हिंदु महिलांवर बलात्कार होत आहेत. हिंदूंच्या घरामध्ये घुसून हिंदूंची घरे कह्यात घेत आहेत. या हिरव्या सापांना भारताने दूध पाजायचे काम केले आहे. हे संकट देशाच्या उंबरठ्यावर येऊन पोचलेले आहे. हिंदूंसाठी ही धोक्याची घंटा आहे. हिंदूंनी वेळीच सावध होऊन एकजूट दाखवावी, असे आवाहन हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांनी केले. ‘हिंदु वाचवा देश वाचवा, हिंदूंनो जागे व्हा’, या अभियानांतर्गत आयोजित केलेल्या हरिपूर (तालुका मिरज) विस्तारित भागातील हिंदूंच्या प्राची लॉन येथील २१ ऑगस्ट या दिवशी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. या सभेला महिला आणि नागरिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी बोलतांना बाळासाहेब मोहिते पाटील म्हणाले की, बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका भारताने पार पाडली. त्यांना साहाय्य केले. हेच बांगलादेशातील मुसलमान आज भारतातील हिंदु, शीख, जैन, सिंधी, बौद्ध बांधव यांच्यावर गैरमुसलमान म्हणून अत्याचार करत आहेत. वेळ पालटल्यानंतर मुसलमान समाजाने त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांचा खरा चेहरा दाखवला आहे.
या वेळी भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे म्हणाल्या की, ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात फसणार्या हिंदु मुलींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हिंदूंच्या आई-वडिलांनी आपल्या मुलींकडे लक्ष ठेवून त्या ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अडकून फसणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. ‘लव्ह जिहाद’चा बंदोबस्त करण्यासाठी सरकारने ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा केला पाहिजे.