सोलापूरहून गांजा विक्रीसाठी घेऊन आलेल्या धर्मांधाला पुणे येथे अटक !
पुणे – येथील कोंढवा परिसरात अमली पदार्थविरोधी पथकाने सोलापूरहून गांजा विक्रीस घेऊन आलेल्या मोबीन अब्दुल रशीद शेख याला पकडले आहे. त्याच्याकडून अडीच लाख रुपये किमतीचा १२ किलो गांजा जप्त करण्यात आला. मोबीन हा कोंढवा परिसरात गांजा विक्रीसाठी घेऊन आला असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकातील पोलीस कर्मचारी अजीम शेख यांना मिळाली. शेखने गांजा कुठून आणला ? तसेच तो कुणाला विक्री करणार होता ? या दृष्टीने अन्वेषण करण्यात येत आहे.
संपादकीय भूमिकालोकसंख्येत अल्पसंख्य धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! |