‘हिंदु इकोसिस्टीम’बळकट करण्यासाठी संघटित होऊन आवाज बुलंद करणे आवश्यक ! – डॉ. वैदेही ताम्हण, प्रमुख संपादिका, आफ्टरनून व्हॉॅईस, मुंबई
जो कुणी हिंदु धर्माचा अवलंब करत आहे, मग तो मुसलमान असो, त्याचा आपण आदर केला पाहिजे. हाही एक हिंदु इकोसिस्टीमचा भाग आहे. आपण एकनिष्ठ राहून धर्माचे कार्य केले पाहिजे. हिंदु धर्मापासून भरकटेल्या लोकांना परत जवळ केले पाहिजे. संस्कार घरातून चालू केले पाहिजे आणि हळूहळू त्याचे समाजात रोपण केले पाहिजे. संत, धर्म, मूलभूत अधिकार यांच्या रक्षणासाठी आपण पुढे सरसावले पाहिजे. हिंदूंनी संघटित होऊन हिंदु धर्माचे संवर्धन करण्याचा संकल्प केला पाहिजे. लहान उपक्रमांतून हिंदूंना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ‘हिंदु इकोसिस्टीम’ (हिंदु यंत्रणा) बळकट करण्यासाठी संघटित होऊन आवाज बुलंद करणे आवश्यक आहे.