लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या यांच्या विरोधातील कायदे राज्यस्तरांवर लागू न करता देशस्तरावर लागू करा ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, ‘सुदर्शन न्यूज’
धर्मांधाला थोडा धक्का जरी लागला, तरी त्याचे सहस्रो भाऊबंद एकत्र येतात. याउलट हिंदूवर संकट आले, तर त्याच्या क्षेत्रातील १०० हिंदूही एकत्र येत नाहीत. यासाठी प्रत्येकाला त्याच्या क्षेत्रात बाहुबली व्हावे लागेल. आपण हिंदु मंदिरे सुशोभित करण्यावर भर देतो. त्यापेक्षा संकटकाळी मंदिराच्या ध्वनीक्षेपकावरून एक आवाज दिला, तर सहस्रो हिंदू कसे एकत्र होतील, अशी स्थिती निर्माण करण्याची आवश्यकता आहे. सध्या मुसलमानांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यासाठी ‘लोकसंख्या नियंत्रण कायद्या’ऐवजी या कायद्याचे नाव पालटून ‘मुसलमान लोकसंख्या नियंत्रण कायदा’ करण्याची वेळ आली आहे. लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या यांच्या विरोधातील कायदे राज्यस्तरांवर लागू न करता देशस्तरावर लागू करण्याची मागणी सर्व हिंदुत्वनिष्ठांनी करावी.