करंजाडे, नवीन पनवेल (जिल्हा रायगड) येथील ५३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला कु. ऋग्वेद राजेश गावडे (वय ७ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. ऋग्वेद गावडे हा या पिढीतील एक आहे !

(‘वर्ष २०२४ मध्ये कु. ऋग्वेद राजेश गावडे याची आध्यात्मिक पातळी ५३ टक्के आहे.’ – संकलक)

कु. ऋग्वेद गावडे
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या ! 

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

उच्च स्वर्गलोकातून जन्माला आलेला कु. ऋग्वेद राजेश गावडे याचा २४.८.२०२४ (श्रावण कृष्ण षष्ठी) या दिवशी सातवा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या आईला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

कु. ऋग्वेद राजेश गावडे याला सातव्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

सौ. ज्योती गावडे

१. वय १ ते ३ वर्षे

अ. ‘कु. ऋग्वेदची आजी नामजपाला बसल्यावर तोसुद्धा तिच्या बाजूला बसायचा. तसेच कुणी आरती म्हणत असेल, तर तोसुद्धा आरती म्हणायचा.

२. वय ३ ते ५ वर्षे

२ अ. स्वच्छतेची आवड असणे : तो त्याचा कपड्यांचा आणि अभ्यासाचा कप्पा स्वतः आवरतो.

२ आ. देवाची आवड : त्याला गणपति हा देव विशेष आवडतो. गणपतीचा नामजप करणे, गळ्यामध्ये गणपतीचे चित्र असलेले पदक घालणे अशा कृती तो करत असे. आता तो गणपतीचे चित्रही काढतो.

३. वय ५ ते ७ वर्षे

३ अ. साधना : तो बालसंस्कारवर्गाला जातो, वहीमध्ये नामजप लिहितो, कापूर-अत्तराचे उपाय करतो. त्याला देवतांची नावे लिहायला सांगितले की, त्यामध्ये तो ‘परम पूज्य’ असेही लिहितो. त्याच्या मामाच्या चारचाकी गाडीत बसल्यावर तो श्रीरामाची भक्तीगीते लावतो. ‘सत्संगात स्वयंसूचना कशी बनवायची ?’, हे शिकवल्यावर त्याने त्याप्रमाणे प्रयत्न केले.

३ आ. उत्तम निरीक्षणक्षमता आणि तत्त्वनिष्ठता : त्याचे निरीक्षण पुष्कळ चांगले आहे. कुणाकडून काही चूक झाली, तर ते त्याच्या लगेच लक्षात येते आणि तो संबंधितांना त्याची जाणीव करून देतो. आमच्या घरी गणेशोत्सवानिमित्त प्रवचन झाले होते. त्या वेळी ऋग्वेद घरातच सायकल चालवत होता. त्याने प्रवचन मन लावून ऐकले.

३ इ. सत्संग आणि सेवा : ऋग्वेद सध्या साधना सत्संगाला येतो. तिथे सांगितला जाणारा विषय तो व्यवस्थित ऐकतो. तसेच विषयानुसार जे काही दाखवले जाते, ते पूर्ण वहीमध्ये लिहून काढतो. ऋग्वेद त्याच्या मामाच्या समवेत ‘साप्ताहिक सनातन प्रभात’च्या वितरणाला जातो किंवा त्याला इतर काही सेवा असल्यास त्याच्या समवेत जातो.

३ ई. मायेपासून अलिप्त असणे : ऋग्वेद जेथे जाईल, तिथला होऊन जातो. तो आजी-आजोबांकडे असल्यास आई-बाबांची आठवण काढत नाही किंवा आमच्या समवेत असल्यास आजी-आजोबांकडे जाण्याचा कधी हट्ट धरत नाही.

– सौ. ज्योती राजेश गावडे (कु. ऋग्वेदची आई), करंजाडे, नवीन पनवेल, जिल्हा रायगड. (२८.५.२०२४)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.