शाळांमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष नियमावली सिद्ध करा ! – अकोला बार असोसिएशनचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
अकोला, २३ ऑगस्ट (वार्ता.) – बदलापूर येथील घटनेनंतर काझिखेड (अकोला) येथेही लहान मुलीवर अत्याचार होण्याची घटना घडली. काझिखेड येथील आरोपी शिक्षकास कठोर शिक्षा द्यावी, या मागणीसाठी अकोला बार असोसिएशनच्या ३५ विधिज्ञांनी कोलकाता, बदलापूर आणि काझिखेड येथील लैंगिक अत्याचारांच्या घटनांचा निषेध करत अकोला जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले.
या वेळी अकोला बार अससोसिएशनचे अध्यक्ष अधिवक्ता हेमंत मोहता म्हणाले, ‘‘शाळांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले पाहिजेत आणि शाळांमध्ये मुली अन् महिला यांच्या सुरक्षिततेसाठी नियमावली बनवावी.’’
यावर जिल्हाधिकारी कुंभार म्हणाले, ‘‘आम्ही शाळांना सीसीटीव्ही बसवण्याचे आणि शाळांमधून ‘गुड टच’ (चांगला स्पर्श), ‘बॅड टच’ (वाईट स्पर्श) या संदर्भात मुलांना माहिती व्हावी, या दृष्टीने शाळांनी कार्यक्रम आयोजित करण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत.
या निवेदनात बदलापूर घटनेतील आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात आली. या प्रसंगी ‘महाराष्ट्र आणि गोवा बार काऊन्सिल’चे सदस्य ज्येष्ठ अधिवक्ता मोतीसिंगजी मोहता, उपाध्यक्ष नरेंद्र बेलसरे, सचिव दुष्यंत धोत्रे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कुंभार यांचा सकारात्मक प्रतिसाद ! |