ठाणे येथील ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. आरव अनिकेत मेढेकर (वय १० वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. आरव मेढेकर या पिढीतील एक आहे !
(‘वर्ष २०२४ मध्ये कु. आरव अनिकेत मेढेकर याची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के आहे.’ – संकलक)
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
उच्च स्वर्गलोकातून जन्माला आलेला कु. आरव अनिकेत मेढेकर याचा २४.८.२०२४ (श्रावण कृष्ण षष्ठी) या दिवशी दहावा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या वडिलांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
कु. आरव अनिकेत मेढेकर याला दहाव्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. कु. आरव याच्या जन्मापूर्वी जाणवलेली सूत्रे
१ अ. स्तोत्रपठणाच्या वेळी गर्भाची पुष्कळ प्रमाणात हालचाल जाणवणे : सौ. नेहाला (कु. आरवच्या आईला) गर्भधारणा झाल्यापासून मी नियमित तिच्या पोटावर हात ठेवून रामरक्षा, हनुमान चालीसा आणि मारुति स्तोत्र म्हणत असे. इतर वेळी बाळाची हालचाल फारशी जाणवत नसे; मात्र स्तोत्र म्हणत असतांना बाळाची हालचाल पुष्कळ प्रमाणात जाणवत असे. सौ. नेहा अभंग किंवा भक्तीगीते ऐकत असतांनाही तिला अशीच हालचाल जाणवत असे.
२. आरवच्या जन्मानंतर जाणवलेली सूत्रे
२ अ. कापूर हिर्याप्रमाणे चमकणे : आरव जन्माला आल्यावर देवघरातील कापराच्या डबीतील कापूर बरेच महिने चमकत होता. या पूर्वी कापराची अशी चमक आम्ही कधीच पाहिली नव्हती.
२ आ. डोक्यावरील डाव्या बाजूचे केस चमकदार असणे : आरव लहान असतांना त्याच्या डोक्यावरील डाव्या बाजूचे केस पुष्कळ चमकदार दिसत होते. ३ – ४ वर्षे ती चमक तशीच होती.
२ इ. लहान असतांना हनुमानाचे दर्शन होणे : आरव ३ वर्षांचा असतांना एक दिवस संध्याकाळी ७ च्या सुमारास एकाग्रतेने खिडकीतून बाहेर पहात होता. थोड्या वेळाने मी त्याला विचारले, ‘‘आकाशात काय पहात आहेस ? ’’ तेव्हा त्याने वर हात दाखवून सांगितले, ‘‘तो बघा वर हनुमान आहे आणि तो माझ्याकडे बघून हसतोय.’’
२ ई. गावी जातांना आरवला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे दर्शन होणे : आरव ४ वर्षांचा असतांना एकदा आम्ही सर्व जण सायंकाळी गाडीने वेंगुर्ला येथे जाण्यास निघालो. वाटेत रस्ता चुकून रात्री ३ वाजण्याच्या सुमारास आम्ही राधानगरी धरणाच्या जवळ पोचलो. त्या निर्मनुष्य भागात अचानक २ जण दुचाकी वरून आले आणि त्यांनी आम्हाला पुढचा रस्ता दाखवला. ते निघून गेल्यावर घाट संपेपर्यंत आरव आकाशाकडे पहात होता. दुसर्या दिवशी जेव्हा मी त्याला विचारले, ‘‘आता सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या दर्शनाला जायचे ना ?’’ तेव्हा तो म्हणाला, ‘‘मी कालच पुष्कळ वेळ त्यांचे दर्शन घेतले. ते आपल्या बरोबरच आकाशातून येत होते.’’ तेव्हा मला ‘तो काल रात्री आकाशाकडे का पहात होता’, हे माझ्या लक्षात आले आणि ‘ईश्वरानेच आमची गाडी सुखरूप निवासस्थानी पोचवली’, याचीही जाणीव झाली.
२ उ. आरव मनापासून नामजप करतो.
– श्री. अनिकेत अरुण मेढेकर (आरवचे वडील), कळवा, जिल्हा ठाणे. (२२.४.२०२४)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.