रशिया-युक्रेन यांच्यामध्ये समतोल साधणारा भारत हा जगातील एकमेव देश !
रशिया-युक्रेन संघर्ष चालू होऊन २ वर्षे झाली. या २ वर्षांच्या काळात जागतिक नेत्यांनी एक तर रशियाला भेट दिलेली नाही, तसेच युक्रेनला कोणत्याही नेत्याने भेट दिलेली नाही. या काळात एकाच वेळी दोन्ही देशांना कोणत्याही जागतिक नेत्यांनी भेटी दिलेल्या नाहीत. हे केवळ भारताला शक्य झाले. पंतप्रधान मोदी यांनी गेल्या मासात रशियाला भेट दिली, तर सध्या ते युक्रेनच्या भेटीवर आहेत.
अशा पद्धतीने देशांमध्ये समतोल साधणारा भारत हा जगातील एकमेव देश ! हे अमेरिका आणि चीन यांनाही शक्य झाले नाही. यातून केवळ भारताचा वाढता जागतिक प्रभावच सिद्ध होत नाही, तर ‘युद्ध थांबवून शांतता प्रस्थापित करण्याची क्षमता भारतात आहे’, याची प्रचीती जगाला येत आहे.
– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक, पुणे. (२२.८.२०२४) (साभार : फेसबुक)