पुणे येथील गुन्हेगाराला ४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार प्रकरणी २१ वर्षे सक्तमजुरी !
७५ सहस्र रुपयांच्या दंडाची शिक्षा !
पुणे – सराईत गुन्हेगार उच्चाप्पा मंगळूर याला तडीपार केलेले असतांनाही त्याने पुण्यात येऊन ४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केले. न्यायालयाने त्याला २१ वर्षे सक्तमजुरी आणि ७५ सहस्र रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश के.पी. क्षीरसागर यांनी हा निकाल दिला आहे. मुलगी घरासमोर अंगणवाडीच्या मैदानात खेळत होती. आरोपी तिला बिजलीनगर येथील टेकडीवर घेऊन गेला. तिथे अत्याचार केले. ही घटना २ ऑक्टोबर २०१८ या दिवशी घडली होती. यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली.