कोल्हापुरातील शिये येथे १० वर्षीय मुलीचा मृतदेह शेतात आढळला !
कोल्हापूर – बदलापूर येथील २ लहान मुलींवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असतांचा कोल्हापूर येथील शिये येथे १० वर्षीय मुलीचा मृतदेह २२ ऑगस्टला ऊसाच्या शेतात आढळून आला आहे. शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये रामनगर येथे ३ वर्षांपूर्वी कामगार म्हणून काम करण्यासाठी एक कुटुंब आले आहे. २१ ऑगस्टला दोघेही कामाला गेले. घरी आल्यावर सायंकाळी त्यांना मुलगी दिसली नाही. यानंतर शोधाशोध करूनही मुलगी न मिळाल्याने नातेवाइकांनी शिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी प्रयत्न करून शोध घेतल्यावर मुलीचा मृतदेह सापडला. या प्रकरणी स्थानिक नागरिकांनी मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. (अल्पवयीन मुली, तरुणी यांच्या हत्या होणे, त्यांच्यावर अत्याचार होणे, या गोष्टी छत्रपतींच्या महाराष्ट्राला काळिमा फासणार्या आहेत. मुली-महिला सुरक्षित रहाण्यासाठी पोलीस कार्यक्षम कधी होणार ? – संपादक)
आरोपीला शोधून कठोर शिक्षा करू ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्रीकोल्हापूर – या संदर्भात पोलिसांनी तात्काळ कारवाई चालू केली आहे. काही संशयितांना कह्यात घेतले असून त्यांचे अन्वेषण चालू आहे. या घटनेच्या मुळाशी जाऊन जो कुणी आरोपी असेल, त्याला शोधून काढून कठोर शिक्षा केली जाईल, तसेच पीडित कुटुंबाला साहाय्य केले जाईल, असे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले. ते महायुतीच्या लाडकी बहीण वचनपूर्तीच्या कार्यक्रमासाठी कोल्हापूर येथे आले होते. ‘या प्रकरणी गुन्हेगाराला कठोर शिक्षा करू’, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. |