मुलाला डेंग्यूच्या आजारामुळे आलेला ताप कापराने दृष्ट काढल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने उतरणे
१. मुलाला डेंग्यू झाल्यामुळे रुग्णालयात भरती करणे आणि ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सर्व सांभाळून घेतील’, असा विचार येणे अन् गावातील सनातनच्या सत्संगाला जाता येणे
‘माझा मुलगा कु. चैतन्य (वय १४ वर्षे) याला डेंग्यू (एका विषाणूमुळे होणारा संसर्ग) झाल्यामुळे त्याला रुग्णालयात भरती केले होते. त्याच दिवशी आमच्या गावात सनातनचा सत्संग होता. ‘गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) सर्व सांभाळून घेतील’, असा विचार करून मी आणि माझी पत्नी (सौ. गायत्री) सत्संगाला गेलो. तेव्हा माझ्या भावाचा मुलगा (कु. वैभव राजाराम चव्हाण, वय २५ वर्षे) रुग्णालयात थांबला होता.
२. रुग्णालयात परत आल्यावर ‘मुलाला पुष्कळ ताप आहे’, असे आधुनिक वैद्यांनी सांगणे आणि डोक्यावर थंड पाण्याच्या पट्टया ठेवल्या; तरीही ताप न उतरणे
आम्ही दोघे सत्संगाहून रुग्णालयात परत आल्यावर चैतन्यला थंडी वाजून त्याचे अंग थरथरत होते. ‘त्याला पुष्कळ ताप आहे’, असे आधुनिक वैद्यांनी आम्हाला सांगितले. मी आणि माझ्या पत्नीने गुरुदेवांना प्रार्थना केली. आम्ही नामजप करत मुलाचे अंग थंड पाण्याने पुसले. आम्ही त्याच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्टया ठेवल्या; तरीही ताप उतरत नव्हता. त्यामुळे आम्हाला थोडी काळजी वाटत होती.
३. कापूर मुलाच्या अंगावरून उतरवणे आणि तो जाळल्यावर कापराचा तीव्र गंध येणे अन् रात्री १२ वाजता मुलाचा ताप पूर्णपणे उतरणे
गुरुदेवांच्या कृपेने माझ्या आणि पत्नीच्या मनात ‘कापराचे उपाय करूया’, असा विचार आला. सत्संगात सांगितल्याप्रमाणे कापराचा एक लहानसा तुकडा घेतला. प्रार्थना अन् नामजप करत कापूर मुलाच्या अंगावरून उतरवला. तो कापूर जाळल्यावर कापराचा अत्यंत तीव्र असा गंध आला. रात्री १० वाजता मुलाचा ताप न्यून होण्यास आरंभ झाला आणि रात्री १२ वाजता ताप पूर्णपणे उतरला. तेव्हा त्याला शांतपणे झोप लागली. नंतर गुरुकृपेने मुलाला पुन्हा ताप आला नाही.
४. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अगाध कृपा आणि कापराचे महत्त्व’, याची जाणीव होणे
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अगाध कृपा आणि कापराचे महत्त्व’, याची मला जाणीव झाली. मला ही वेगळी अनुभूती आली. माझ्या आयुष्यात असे कधीच घडले नाही. गुरुदेवांचे रूप सतत माझ्या डोळ्यांसमोर येऊन त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त होत होती. तेव्हा माझ्या नेत्रांतून अखंड भावाश्रू ओघळत होते.’
हे गुरुदेव, ‘तुमच्या कृपेमुळेच मुलाचा ताप उतरला. तुमची कृपा अशीच आमच्यावर राहू दे’, अशी माझी प्रार्थना झाली.’
– श्री. उद्धव चव्हाण, कोल्हापूर (२७.६.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |