‘साधकत्ववृद्धी शिबिरा’च्या वेळी मुंबई येथील डॉ. (सौ.) सायली यादव यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

‘१९.१.२०२४ ते २१.१.२०२४ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘साधकत्ववृद्धी शिबिरा’त सहभागी होण्याची संधी मला मिळाली होती. त्या वेळी मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

डॉ. (सौ.) सायली यादव

१. अश्विनी कुलकर्णी यांच्याकडून ‘चूक कशी सांगावी ?’, हे शिकणे

अश्विनी कुलकर्णी यांनी पहिल्या दिवशी सर्व साधिकांसमोर एक चूक सांगितली. तेव्हा ‘सहसाधिकांना स्वतःची चूक कशी सांगायची ?’, हे मला शिकता आले, तसेच मला ताईंकडून गुरुकार्याची तळमळ, साधकांप्रती संवेदनशीलता, लढाऊ वृत्ती आणि प्रेमभाव शिकता आला.

२. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आध्यात्मिक प्रयोगांचे विश्लेषण करत असतांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

२ अ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या ठिकाणी मला अधून मधून गुरुदेवांचे रूप दिसत होते.

२ आ. सद्गुरु गाडगीळकाका यांचे चरण आणि डोळे यांकडे पाहिल्यावर साधिकेला ती गतीने पोकळीत जात असल्याचे जाणवणे : सद्गुरु गाडगीळकाका यांचे आगमन झाल्यावर मी प्रथम सद्गुरु काकांच्या चरणांकडे आणि नंतर त्यांच्या डोळ्यांकडे पाहिले. तेव्हा ‘मी नामजप करत गतीने एका पाेकळीत जात आहे’, असे मला वाटले. बर्‍याच वेळाने तो प्रवास थांबला. सद्गुरु काकांच्या डोळ्यांतून प्रक्षेपित होणार्‍या तेजतत्त्वामुळे ‘माझ्यावरील अनिष्ट शक्तीचे आवरण गळून पडत आहे’, असे मला जाणवत होते.

२ इ. सद्गुरु गाडगीळकाका यांनी घेतलेल्या वायुतत्त्वाच्या प्रयोगांत साधिकेचा हात विविध दिशांनी हलणे : सद्गुरु गाडगीळकाका यांनी वायुतत्त्वाचे प्रयोग घेतले. तेव्हा साधकांनी हात वर केले आणि डोळे बंद केले. सद्गुरु काकांनी प्रयोग चालू केल्यावर माझा हात हलू लागला. नंतर माझा हात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने गोलाकार फिरू लागला. नंतर माझा हात घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने फिरू लागला. माझा हात हलण्याची गती पुष्कळ वाढत होती. तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला.

– डॉ. (सौ.) सायली यादव (वय ४३ वर्षे), मुलुंड, मुंबई. (२१.१.२०२४)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक