डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी ‘युएपीए’ कलम हटवल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान
मुंबई – डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केल्याच्या आणि ‘बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्या’च्या अंतर्गत आरोपींवर लावण्यात आलेली ‘आतंकवादी कृत्य आणि गुन्हेगारी कारस्थान’ (युएपीए) या कायद्यातील कलमे हटवली होती. या विरोधात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची मुलगी मुक्ता दाभोलकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपिठापुढे २१ ऑगस्ट या दिवशी याविषयी प्राथमिक सुनावणी झाली. या याचिकेची पुढील सुनावणी २३ सप्टेंबर या दिवशी होणार आहे. मुक्ता दाभोलकर यांनी अधिवक्ता अभय नेवगी यांच्याद्वारे हे अपील केले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि सनातनचे साधक श्री. विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता केली आहे, तर सर्वश्री सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा दिली आहे.