सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी कृष्णकमळाच्या वेलीवर येणार्या फुलांच्या माध्यमातून गुरुमाऊली घरी आल्याचा आनंद मिळणे
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी दारातील कृष्णकमळाच्या वेलीवर पुष्कळ फुले येणे आणि ‘गुरुमाऊलींच्या जन्मदिनाचा आनंद कृष्णकमळाच्या वेलीला झाला आहे’, असे जाणवणे
‘११.५.२०२३ या दिवशी झालेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या १ – २ दिवस आधी आमच्या दारातील कृष्णकमळाच्या वेलीला अकस्मात् पुष्कळ फुले आली होती. जन्मोत्सव सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पहातांना आमच्या लक्षात आले, ‘प्रत्यक्ष श्रीकृष्णाचे अवतार असलेल्या गुरुमाऊलींच्या जन्मदिनाचा आनंद कृष्णकमळाच्या वेलीला झाला होता; म्हणून वेलीवर पुष्कळ फुले आली होती.’ तेव्हा आम्हा उभयतांची (मी आणि माझी पत्नी सौ. कल्पना हिची) भावजागृती झाली.
२. दुसर्या वर्षीही जन्मोत्सवाच्या दिवशी कृष्णकमळाच्या वेलीवर १०० हून अधिक फुले आल्यावर भावजागृती होणे
२७.५.२०२४ या दिवशी झालेल्या गुरुमाऊलींच्या जन्मदिनी त्याच कृष्णकमळाच्या वेलीवर १०० हून अधिक फुले आली होती. त्यामुळे मागील वर्षाची आणि या वर्षाची अनुभूती आठवून आम्हा दोघांची पुष्कळ भावजागृती झाली. आम्ही त्या फुलांचा पुष्पहार गुरुमाऊलींच्या छायाचित्राला घातला आणि दोघांनीही कृतज्ञता व्यक्त केली.
मागील वर्षीपासून जन्मोत्सवाच्या दिवशी फुलांच्या माध्यमातून गुरुमाऊली आमच्या घरी येऊन आम्हाला आनंद देतात. आम्ही त्यांच्या चरणी कृतज्ञ आहोत.’
– श्री. लहू खामणकर (वय ६८ वर्षे) आणि सौ. कल्पना खामणकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ५४ वर्षे), वणी, जिल्हा यवतमाळ. (२५.५.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |