नागपूर येथील बालसाधिका कु. कार्तिकी ढाले हिला रामनाथी आश्रमात आलेल्या अनुभूती
१. ‘पू. भार्गवराम यांच्यासमवेत खेळतांना मला वाटले, ‘मी बाळकृष्णाच्या समवेतच खेळत आहे.’
२. आश्रमातील स्वागतकक्षात असलेल्या प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे पाहून मला वाटले, ‘ते साक्षात् माझ्या समोर बसले आहेत.’
३. आश्रमातील स्वागतकक्षात असलेले श्रीकृष्णाचे छायाचित्र पाहिल्यावर त्या छायाचित्रामध्ये सजीवता जाणवली.
४. रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात आरतीच्या वेळी सद्गुरूंची आरती म्हणतांना ‘साक्षात् गुरुदेव माझ्यासमोर आहेत आणि मी आरती करत आहे’, असे मला वाटले.
५. रामनाथी आश्रमातील मंदिर परिसरात केर काढतांना ‘श्रीकृष्ण माझ्या समवेत आहे आणि मी त्याच्याशी बोलत आहे’, असे मला जाणवले, तसेच ‘श्रीकृष्ण मला बासरी वाजवून दाखवत आहे’, असे वाटले.’
– कु. कार्तिकी अश्विन ढाले (वय १२ वर्षे) (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), नागपूर (१४.५.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |