पार्श्वभूमी न पडताळता शाळेतील कामावर संबंधितांना कसे नेमता ? – सुशीबेन शहा, अध्यक्षा, राज्य बाल हक्क आयोग
मुंबई – शाळेत किंवा कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कंत्राटी पद्धतीवर कुणाला कामावर घ्यायचे असेल, तर तुम्ही त्या व्यक्तीची पार्श्वभूमी न पडताळता तिला कामावर कसे घेता ? अशा लोकांना शाळेत ठेवण्यापूर्वी त्यांची पार्श्वभूमी पडताळली पाहिजे. जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या अंगावर शाळेचा गणवेश आहे, तोपर्यंत त्यांचे दायित्व शाळेचे असते, असे प्रतिपादन राज्य बाल हक्क आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा यांनी केले. बदलापूर येथे विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणी त्या बोलत होत्या.