रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय
१. अधिवक्ता दत्तात्रय सुधाकर कुलकर्णी (सचिव, श्री चौंडेश्वरीमाता मंदिर), नागठाणे, महाराष्ट्र.
अ. ‘सनातन धर्माविषयी माहितीपूर्ण लेख आणि चलचित्रे पाहून माझ्या मनातील बर्याच शंकांचे निरसन झाले.
आ. सर्वांचे आदरातिथ्य करण्याचा सनातनचा प्रामाणिक प्रयत्न पाहून आम्ही अचंबित झालो.’
२. श्री. ज्ञानसागर जवकर, (जगदंब प्रतिष्ठान), बीड, महाराष्ट्र.
अ. ‘आश्रमातील वातावरण अतिशय प्रसन्न आणि चैतन्यमय आहे.
आ. मला सकारात्मक ऊर्जेचा अनुभव आला.’
३. श्री. हरिदास नानवटकर (विश्वस्त, श्रीराम मंदिर), रिद्धपूर, अमरावती, महाराष्ट्र.
अ. ‘आश्रम पाहून माझे मन तृप्त झाले.
आ. ‘येथे आल्यानंतर खरोखरच देवाचे दर्शन झाले’, असे मला वाटले.
इ. भारतातील सर्वांनी हा आश्रम पहावा.’
४. श्री. नीलेश शिवराम जटाळे (अध्यक्ष, श्री आशा मनीषा देवस्थान), दर्यापूर, अमरावती, महाराष्ट्र.
अ. ‘आश्रम अप्रतिम आहे.
आ. आश्रमात चैतन्याचा झरा आणि अविरत चैतन्यमय लहरींची स्पंदने जाणवतात.
इ. मला साधकांच्या सभोवती एक वेगळीच ऊर्जा जाणवली.’
५. श्री. प्रदीप मलिये (संस्थापक अध्यक्ष, जय बजरंग युवा शक्ती संघ), दर्यापूर, अमरावती, महाराष्ट्र.
अ. ‘माझे मन प्रसन्न झाले.
आ. मला अध्यात्माचे दर्शन झाल्यासारखे वाटले.’
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |