कौटुंबिक कठीण प्रसंगाच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उद्गारांचा सनातनचे संत पू. संदीप आळशी यांनी सांगितलेला भावार्थ
१. कुटुंबीय सामोरे जात असलेल्या कठीण परिस्थितीविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काढलेले उद्गार
‘आमच्या कुटुंबात एकदा पुष्कळ कठीण परिस्थिती निर्माण झाली होती. आम्ही ती परिस्थिती काही काळ आनंदाने स्वीकारली; पण त्यानंतर ३ – ४ मासांनी आम्हाला त्या परिस्थितीचा कंटाळा आला. यासंदर्भात आम्ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगितल्यावर ते आम्हाला म्हणाले, ‘‘देव तुमची परीक्षा घेतोय !’’
२. ‘कठीण परिस्थिती आनंदाने स्वीकारून साधना करत रहाणे’, ही परीक्षा असल्याचे पू. संदीप आळशी यांनी सांगणे
त्या परिस्थितीत ‘आम्ही कुटुंबीय कुठे तरी अल्प पडतोय’, असे आम्हाला वाटत होते. तेव्हा पू. संदीप आळशी यांनी मला त्याचा अर्थ पुढील प्रकारे समजावून सांगितला. ते मला म्हणाले, ‘‘कुठे तरी अल्प पडतोय’, असे नाही. यासंदर्भात ‘आपण आहे ती परिस्थिती स्वीकारून त्यात आनंदी रहाण्याचा प्रयत्न करणे आणि साधना करत रहाणे, म्हणजेच प्रार्थना, कृतज्ञता अन् सेवा करत रहाणे’, असे देवाला अपेक्षित आहे. हीच परीक्षा असते.’’
– कु. संध्या माळी, फोंडा, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |