मुंबईत हिंदु मुलींचे चित्रीकरण करणार्या धर्मांधास चोप
पोलिसांकडून अटक !
मुंबई – प्रँक (खोड्या) करण्याच्या नावाखाली मुलींचे बलपूर्वके चित्रीकरण करणारा इरफान अहमद मजीद अहमद (वय २३ वर्षे) याला मनसेचे नेते मनोज चव्हाण आणि कांजूरमार्गच्या स्थानिक नागरिक यांनी चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. तो उत्तरप्रदेशचा रहिवासी आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी तो कांजूरमार्गच्या अशोकनगर भागात येणार्या-जाणार्या मुलींचे भ्रमणभाषमध्ये चित्रीकरण करत होता. मुलींनी विरोध केल्यानंतरही त्याने पाठलाग करून त्यांचे व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. (अशांना वेळीच वठणीवर आणण्यासाठी मुलींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्यायला हवे, तरच त्यांच्या संदर्भात घडणार्या अशा अपप्रकारांना आळा बसेल ! – संपादक)
याविषयीची माहिती मनसेचे नेते मनोज चव्हाण आणि स्थानिक नागरिक यांना समजल्यावर त्यांनी त्याला पकडून चोप दिला. या वेळी त्याच्याकडे भ्रमणभाष मागितला असता त्याने देण्यास नकार दिला. नंतर त्याच्या भ्रमणभाषमध्ये रस्त्यावरून जाणार्या मुलींचे चित्रीकरण आढळून आले. तेव्हा त्याने ‘प्रँक व्हिडिओ’ बनवत असल्याचे सांगितले. (खोटारडेपणा करणारे मुसलमान ! – संपादक) पोलिसांनी या प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे.
संपादकीय भूमिकाअशा धर्मांधांना कठोरात कठोर शिक्षा केल्यासच असे प्रकार थांबतील ! |