Atala Devi Temple : जौनपूर (उत्तरप्रदेश) येथील कथित अटाला मशीद, हे अटाला देवी मंदिर ! – पुरातत्व विभाग
जौनपूर (उत्तरप्रदेश) – अटालामाता मंदिर प्रकरणाची २१ ऑगस्टला दिवाणी न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणी न्यायालय २ सप्टेंबर २०२४ या दिवशी निर्णय देणार आहे. हिंदु पक्षाच्या अधिवक्त्यांनी न्यायालयाला सांगितले की, भारतीय पुरातत्व विभागाचे पहिले महासंचालक अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी त्यांच्या अहवालात अटाला मशिदीचे वर्णन ‘अटाला देवी मंदिर’ असे केले आहे.
कन्नौजचे राजा जयचंद राठोड यांनी अटाला देवी मंदिर बांधले होते. ब्रिटीश अधिकारी जे.पी. हेविट आणि ईबी हॉवेल यांनी अटाला मशिदीच्या कारागिरीचे वर्णन ‘हिंदु कारागिरी’, असे केले आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अहवालात अटाला देवी मंदिराची अनेक छायाचित्रे दिली आहेत, ज्यांत शंख, त्रिशूळ, कमळ इत्यादी हिंदु चिन्हांचा समावेश आहे. हिंदु पक्षाच्या अधिवक्त्यांनी सांगितले की, अटाला मशीद हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अंतर्गत ‘संरक्षित स्मारक ’आहे. यामुळे या प्रकरणात ‘प्रार्थना स्थळ कायदा, १९९१’ लागू होत नाही.