World Hindu Federation : बांगलादेशमध्ये मुसलमानांच्या आक्रमणांमुळे हिंदूंचा वंशविच्छेद ! – वर्ल्ड हिंदु फेडरेशन
पॅरिस (फ्रान्स) – बांगलादेशात हिंदूंचा वंशविच्छेद केला जात आहे. मुसलमान हिंदु नेत्यांच्या हत्यांसमवेत हिंदूंची घरे आणि मंदिरे यांची जाळपोळ करत आहेत. हिंदु महिलांचे अपहरण करून त्यांच्यावर बलात्कार केले जात आहेत. सरकारी हिंदु अधिकारी आणि शिक्षक यांना पदावरून पायउतार करण्यास बाध्य केले जात आहे. बांगलादेशातील किमान ५३ जिल्ह्यांत हा प्रकार चालू आहे, अशी माहिती ‘वर्ल्ड हिंदु फेडरेशन’च्या ढाका आणि पॅरिस येथील केंद्रांनी एका अहवालाद्वारे उघड केली. फेडरेशनने ‘सनातन प्रभात’ला हा अहवाल पाठवला आहे.
या अहवालानुसार हरधन रॉय, काजल रॉय, मृणाल कांती चॅटर्जी, वासुदेव दास, सुमन घरामी, संतोष कुमार आणि अन्य एक, असे ७ हिंदू ठार झाले. किमान ३ हिंदु मुलींचे अपहरण आणि २ हिंदु मुलींवर बलात्कार करण्यात आला. ६३ हून अधिक हिंदु मंदिरांची तोडफोड, लूट आणि जाळपोळ करण्यात आली, तसेच २९५ हून अधिक हिंदु कुटुंबांच्या घरांची तोडफोड करण्यात आली. यासमवेत हिंदूंची १९३ दुकाने लुटून ती जाळण्यात आली. यासह ९ हिंदु शिक्षकांना त्यांच्या पदावरून बलपूर्वक पायउतार करण्यात आले.
हिंदूंचा वंशविच्छेदाची माहिती देणार्या या अहवालातील काही ठळक घटना !
१. रंगपूर : हरधन रॉय आणि काजल रॉय या दोन हिंदु नगरसेवकांची हत्या !
२. शुक्ताग्राम : किमान ३५ हिंदु कुटुंबांनी त्यांचे घर सोडून पलायन ! सध्या ते नवगंगा नदीच्या पात्राजवळ आकाशाखाली रहाण्यास बाध्य !
३. हबीगोंज : संतोष कुमार नावाच्या हिंदु पोलिसाची निर्घृण हत्या !
४. खुलना : अन्य एक हिंदु असलेले पोलीस हवालदार सुमन घरामी यांचा अमानुष मारहाणीत मृत्यू !
५. कुस्तिया : इस्लामिया कॉलेजचे हिंदु प्राचार्य यांना मारहाण केल्याने त्यागपत्र देण्यास बाध्य !
६. फेणी : बाशपारा दुर्गा मंदिर लुटून आगीच्या स्वाधीन !
७. सेताबगंज बोचाकगंज : हिंदूंच्या ७ घरांवर आक्रमण करून लूट !
८. जशोर : येथील धोपैडी पलपाडा गावातील १० हिंदूंच्या घरांची जाळपोळ !
९. केशवपूर, बेचपाडा आणि बर्मनपाडा : येथील ८ हिंदूंच्या घरांवर आक्रमण !
१०. मोनीरामपूर (जिल्हा जशोर) : श्री कालीमातेची २ मंदिरे, तसेच श्री दुर्गादेवीचे १ मंदिर यांची जाळपोळ !
११. ताला : येथे उपजिल्ह्याचे अध्यक्ष सनत कुमार घोष यांच्या घराची लूट आणि जाळपोळ ! श्री कालीमाता मंदिर आणि श्री हरेकृष्ण मंदिर लुटून त्यांची नासधूस !
१२. बोगरा : येथील डॉ. गौतम कुमार मोंडाल यांच्या घरावर आक्रमण करून लूट !
१३. जुन्या ढाक्यातील शाखारीबाजार : ४ मंदिरे, तसेच हिंदूंची १२ घरे यांची नासधूस करून लूट ! लोकगायक राहुल आनंद यांच्या घराची नासधूस करून जाळपोळ, तसेच त्यांची तब्बल ३ सहस्र वाद्ये नष्ट !
१४. झेनाइदाह : येथील चकलापाडा नगरपालिकेच्या परिसरातील १० हिंदु कुटुंबांच्या घरांवर आक्रमण करून लूट !
१५. पबना : एका हिंदु मुलीवर बलात्कार, तसेच १०-१२ हिंदु घरांवर आक्रमण करून नासधूस ! येथील कालीमातेच्या २ मंदिरांची नासधूस !
१६. बागेरहाट : मृणाल कांती चॅटर्जी यांची हत्या ! त्यांचे कुटुंबीयही मोठ्या प्रमाणात घायाळ !
१७. शरियतपूर : पत्रकार दुलाल साहा यांच्या घराची लूट !
१८. लालमोनिरहाट : अमिया प्रसाद या पंचायत सदस्याच्या घरासमवेत अन्य ५ हिंदु कुटुंबांच्या घरांवर आक्रमण करून लूट !
१९. नेत्रकोना : रामकृष्ण मिशन आणि इस्कॉन यांच्या मंदिरांवर आक्रमण करून नासधूस !
२०. चितगांव : २ मंदिरे, तसेच ७-८ हिंदूंच्या घरे यांची लूट ! जिल्ह्यातील रवझान गावातील ४ हिंदूंची घरे आणि ५ हिंदूंची दुकाने यांना लुटून जाळपोळ !