Al Qaeda : ‘अल् कायदा’च्या आतंकवादी गटातील १४ जणांना अटक
देशात आतंकवादी आक्रमण करण्याचा रचत होते कट !
नवी देहली – देहली पोलिसांच्या विशेष शाखेने जिहादी आतंकवादी संघटना ‘अल्-कायदा’च्या स्थानिक आतंकवादी गटाला (‘मॉड्यूल’ला) उघडे पाडले आहे. उत्तरप्रदेश, राजस्थान आणि झारखंड राज्यांच्या पोलिसांच्या सहकार्याने संयुक्त कारवाई करून या ‘मॉड्यूल’मधील १४ जणांना अटक केली आहे. या मॉड्यूलचे नेतृत्व रांचीचे रहिवासी डॉ. इश्तियाक करत होते. भारतात आतंकवादी आक्रमण करण्याचा या मॉड्यूलचा कट होता.
Al Qaeda: 14 people affiliated to Al Qaeda, the terrorist group have been arrested
These Terrorists were plotting to attack the country!
Jihadi terrorism will not end in our nation until and unless such Jihadi terrorists are prosecuted and hanged in a fast track court!#terror… pic.twitter.com/YIEPol3e15
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 22, 2024
या मॉड्यूलच्या सदस्यांना वेगवेगळ्या ठिकाणी शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण दिले जात होते. भिवडी, राजस्थान येथून शस्त्र प्रशिक्षण घेणार्या ६ जणांना अटक करण्यात आली आहे, तसेच उत्तरप्रदेश आणि झारखंड येथून ८ जणांना अटक करण्यात आली आहे. सध्या विविध ठिकाणी अन्वेषण चालू असून आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणाहून शस्त्रे, दारूगोळा आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकाजोपर्यंत जिहादी आतंकवाद्यांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून फासावर लटकवले जात नाही, तोपर्यंत देशातील जिहादी आतंकवाद संपणार नाही ! |