Zaid Hamid Pakistan : (म्हणे) ‘गझवा-ए-हिंद’चे भयानक युद्ध अनेक वर्षे चालू रहाणार !’ – पाकिस्तानचा कथित संरक्षणतज्ञ झैद हमीद
पाकिस्तानचा कथित संरक्षणतज्ञ झैद हमीद याचे चिथावणीखोर वक्तव्य
(गझवा-ए-हिंद म्हणजे भारताचे इस्लामीकरण)
इस्लामाबाद (पाकिस्तान) – ‘गझवा-ए-हिंद’ नीट समजून घ्या. ते एक अतिशय भयानक युद्ध असेल. ते अनेक वर्षे चालू रहाणार आहे. या युद्धात एकदा भारत मुसलमानांच्या कह्यात पुन्हा आला की, तो आपल्याकडेच राहील, असे चिथावणीखोर वक्तव्य पाकिस्तानचा कथित संरक्षणतज्ञ झैद हमीद याने केले. त्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे. प्रखर हिंदुत्वनिष्ठ मधू पूर्णिमा किश्वर यांनीही तो प्रसारित केला आहे. हा व्हिडिओ नेमका केव्हाचा आहे ?, हे मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही.
— Madhu Purnima Kishwar (@madhukishwar) August 21, 2024
या व्हिडिओमध्ये झैद हमीद पुढे सांगतांना दिसत आहे की,
१. जे ‘बुतपरस्त’ (मूर्तीपूजक) होते, त्यांची शेवटची पिढी आता केवळ भारतात उरली आहे. संपूर्ण मुसलमान जगात तुम्हाला असे ‘मुश्रीक’ (बहुदेववादी) मिळत नाहीत, जे भारतात आढळतात.
२. ही तीच जात आहे, ज्याने काबाच्या आत मूर्ती ठेवल्या होत्या. आता त्याच मूर्ती आणि त्यांच्यासारख्या सहस्रावधी मूर्ती अन् देव यांना त्यांनी भारतात ठेवले आहे.
३. पुन्हा एकदा या सर्व मूर्तींचे भंजन होणार आहे. महमूद गझनवीने ज्या प्रकारे सोमनाथ आणि इतर मंदिरे पाडली होती, त्याच पद्धतीने सर्व मंदिरे पाडली जातील. आता मूर्तिपूजकता पूर्णपणे नाहीशी होईल. साहजिकच हे युद्ध भयावह असेल. ते एका दिवसाचे नसेल.
INFLAMMATORY RHETORIC FROM ACROSS THE BORDER
🚨 Pakistan’s alleged defense expert Zaid Hamid’s recent statement about the ‘Ghazwa-e-Hind war’ is deeply concerning.
▫️’Are the Hindus and the Government ready for this war?’ – Provokes the self proclaimed scholar.
👉 A thought to… pic.twitter.com/USTZRpWK6I
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 23, 2024
कोण आहे झैद हमीद ?
झैद हमीद स्वत:ला पाकिस्तानचा धोरणात्मक संरक्षणतज्ञ म्हणवतो. तो पाकची गुप्तचर संघटना आय.एस्.आय.चा जवळचा मानला जातो. झैद सांगतो की, तो सोव्हिएत-अफगाण युद्धात लढला होता. तो प्रतिदिन भारताविरुद्ध बोलतो. खलिस्तानचे सूत्र भडकावणे असो किंवा हिंदूंना कमकुवत म्हणणे असो, सामाजिक माध्यमांवर तो या गोष्टींविषयी सतत बोलतो. तो भारतात रहाणार्या मुसलमानांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न करतो.
संपादकीय भूमिका
|