ठाणे येथे २० वर्षीय तरुणीचा विनयभंग !
असुरक्षित महाराष्ट्र !
ठाणे – येथे विमान आस्थापनामध्ये काम करणार्या २० वर्षीय तरुणीचा तिघांनी विनयभंग केला होता. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तरुणी तिच्या मित्रांसह चारचाकीतून जात होती. त्यांच्या गाडीचा एकाला धक्का लागल्याने त्याने या सर्वांसमवेत वाद घातला. त्याने त्याच्या साथीदारांसह तरुणी आणि तिचे मित्र यांना मारहाण केली, तसेच तरुणीचा विनयभंग केला. या प्रकरणी पीडितेने तक्रार प्रविष्ट केली होती.