छत्रपती संभाजीनगर येथील ५ लाख रुपयांची लाच मागणार्या पीएच्.डी. गाइड प्राध्यापिकेसह ४ जणांना अटक !
छत्रपती संभाजीनगर – महाज्योती शिष्यवृत्तीसाठीच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी ‘पीएच्.डी.’च्या विद्यार्थ्याकडून ५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी ५० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना गाइड प्राध्यापिकेसह ४ जणांना पकडून लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने २० ऑगस्ट या दिवशी अटक केली.
यात येथील रफिक झकेरिया, नवखंडा महिला महाविद्यालयाच्या ग्रंथपाल प्रा. डॉ. एराज सिद्दिकी या मुख्य आरोपींसह ग्रंथालय परिचारक शेख उमर शेख गनी (वय ५२ वर्षे), ई.आर्.एस्. रिसर्च अँड टेक्नॉलॉजीचे साहाय्यक संचालक डॉ. सिद्दिक फैसोद्दीन उपाख्य समीर रियाजोद्दीन (वय ३६ वर्षे) आणि संचालक सिद्दिकी फराज रियाजोद्दीन (वय ३१ वर्षे) यांचा समावेश आहे. डॉ. एराज पसार असून त्यांची २ मुले आणि ग्रंथालय परिचारक अशा तिघांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे.
संपादकीय भूमिकाअसे प्राध्यापक विद्यार्थ्यांवर काय संस्कार करणार ? अशा प्राध्यापकांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! |