अकोला येथे ६ विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवणार्या शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद !
अकोला – येथील बाळापूर तालुक्यात काजीखेड येथे जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेत एका शिक्षकाने अश्लील व्हिडिओ दाखवून इयत्ता आठवीतील ६ विद्यार्थिनींचा छळ केला. शिक्षकाचे नाव प्रमोद सरदार असे आहे. हे कृत्य मागील ४ महिन्यांपासून चालू असल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले. घटना उघड झाल्यावर संतप्त पालकांनी पोलिसांत शिक्षकाविरोधात तक्रार प्रविष्ट केली. यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संशयित आरोपी शिक्षक प्रमोद सरदार यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र समदूर यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले आहे. संपूर्ण प्रकरणात निष्काळीपणा केल्याप्रकरणी केंद्रप्रमुख तायडे यांचेही निलंबन झाले आहे.
संपादकीय भूमिकाअसे नीतीमत्ताहीन शिक्षक असणे हे शिक्षण विभागाला लज्जास्पद ! |