प्रेमभाव असणार्‍या बेळगाव येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या (कै.) सौ. अर्चना लिमये (वय ६५ वर्षे) !

(कै.) सौ. अर्चना लिमये

१. प्रेमभाव 

‘लिमयेकाकू स्वत:साठी साहित्य विकत घेतांना आठवणीने भ्रमणभाष करून ‘बेळगाव सेवाकेंद्रासाठी काही हवे का ?’, असे विचारत असत. काकू सेवाकेंद्रातील साधकांसाठी काही वेळा जेवणाचा डबा पाठवत असत. काकू साधकांसाठी डबा देण्याची सेवा इतकी भावपूर्ण आणि परिपूर्ण करत असत की, तो डबा पाहूनच साधकांची भावजागृती होत असे.

सौ. अर्चना घनवट

२. सेवाभाव

एकदा हनुमान जयंतीनिमित्त ग्रंथप्रदर्शन लावण्याची सेवा होती. त्याच दिवशी काकू स्नानगृहात पडल्या आणि त्यांच्या हाताला लागले. काकू त्याही स्थितीत सकाळी ६ वाजता सेवेसाठी आल्या.

३. कृतज्ञताभावात आणि आनंदात रहाणे

अ. दीड मासांपूर्वी काकू स्नानगृहात पडल्या. तेव्हापासून त्यांना तीव्र शारीरिक वेदना होत होत्या; पण त्यांच्या चेहर्‍यावर तसे कधी जाणवले नाही. त्या कृतज्ञताभावात आणि आनंदात होत्या. मी त्यांना भेटायला रुग्णालयात गेले होते. तेव्हा त्या ‘गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) माझ्यासाठी किती करतात !’, असे हात जोडून सांगत होत्या.

आ. ‘काकू पूर्वीच्या तुलनेत पुष्कळ स्थिर झाल्या होत्या’, असे मला वाटले.’

– सौ. अर्चना घनवट, बेळगाव, कर्नाटक. (६.८.२०२४)