सर्व प्रकारचे भेद विसरून ‘हिंदु’ या नात्याने संघटित होण्याचा भांडुपकरांचा निर्धार !
भांडुप येथे जिहाद पीडित मृत हिंदूंना श्रद्धांजली !
मुंबई – लव्ह जिहाद पीडित मृत हिंदु भगिनी आणि बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचारात मृत हिंदू यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भांडुप येथे १७ ऑगस्ट ‘हिंदु वेदना- श्रद्धांजली’ सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी श्रद्धांजली वाहिल्यानंतर आपला धर्म, संस्कृती, आपली भूमी आणि आपली माणसे यांचे रक्षण करण्यासाठी सर्व भेद विसरून हिंदु म्हणून संघटित होण्याचा निर्धार येथे समस्त भांडुपकर हिंदूंनी येथे केला. या सभेला परिसरातील हिंदु मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले होते.
‘शिवशंभू विचार मंच’चे श्री. अभय जगताप यांनी येथे त्यांचे विचार मांडले. या सभेला ठाकरे गटाचे आमदार रमेश कोरगावकर, मनसे विभाग अध्यक्ष संदीप जळगावकर, भाजप विधानसभा अध्यक्ष प्रवीण दहितुले, शिवसेना महिला विधानसभा अध्यक्षा श्रीमती नेहा पाटणकर, माजी मनसे नगरसेविका श्रीमती वैष्णवी सरफरे उपस्थित होते.
सभेत हिंदूंनी केलेले ठराव
१. आपली संस्कृती जपण्यासाठी पक्षीय/प्रांतीय भेद विसरून एक व्हा.
२. हिंदूंसाठी काम करणार्यांच्या पाठीशी उभे रहा.
३. आपल्या विभागातील सर्व प्रकारच्या कामांचे परवाने हिंदूंना मिळवून देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करा.
४. नशामुक्त भांडुप करण्यासाठी आपली यंत्रणा राबवा.
५. लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि नशामुक्त भांडुपसाठी जिहादी वृत्तीच्या बांगलादेशी फेरीवाल्यांना भांडुपमध्ये बस्तान बसवू देऊ नका.