भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडेगुरुजी यांच्या संत सन्मान सोहळ्याच्या वेळी साधकाला जाणवलेली सूत्रे !
‘११.०६.२०२४ या दिवशी भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडेगुरुजी (वय ८९ वर्षे) यांचा संत सन्मान सोहळा झाला. तो भावसोहळा पहातांना मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. पू. शेवडेगुरुजी बोलत असतांना त्यांच्यात क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज यांचा अपूर्व संगम मला अनुभवता आला.
२. प.पू. गुरुदेवांप्रती (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) पू. शेवडेगुरुजी यांचा उत्कट भाव पाहून माझी भावजागृती झाली.
३. प.पू. गुरुदेव आणि पू. गुरुजी यांचा परस्पर स्नेहभाव पाहून पू. शेवडेगुरुजी यांची जणू श्रीरामाप्रति हनुमंताची दास्यभक्तीच दिसून येते.
४. ‘त्या सोहळ्यात प्रभु श्रीराम, भगवान परशुराम आणि हनुमंत हे प.पू. गुरुदेव अन् पू. गुरुजी यांच्या रूपात उपस्थित आहेत’, असे मला जाणवले.
प.पू. गुरुमाऊली आणि पू. गुरुजी यांच्या चरणांशी अनंत कोटी कृतज्ञ आहे.’
– श्री. सुरेश श्रीनिवास नाईक (वय ६६ वर्षे), ढवळी, फोंडा, गोवा.
|