प्रेमळ आणि गुरुदेवांप्रती अपार भाव असलेल्या पू. (कै.) श्रीमती सौदामिनी कैमलआजी (वय ८२ वर्षे) !

(कै.) पू. सौदामिनी कैमल

१. ‘पू. (कै.) कैमलआजी यांनी वृद्धावस्थेत घर सोडले आणि त्या केरळ सेवाकेंद्रात पूर्णवेळ साधना करण्यासाठी राहिल्या. त्यांनी सेवाकेंद्रातील कार्यपद्धतींशी जुळवून घेतले होते.

२. सेवाभाव

पू. अम्मांना सेवेचे गांभीर्य होते. साधकांना अम्मांच्या सेवेचा पाठपुरावा करावा लागत नसे.

श्री. सुदीश पुथलत

३. प्रेमभाव

पू. अम्मा नेहमी साधकांचा विचार करत असत. ‘साधक भुकेले रहाणार नाहीत’, याची पू. अम्मा काळजी घेत असत. अम्मांचे वय झाले असूनही आणि त्यांना शारीरिक अडचणी असूनही त्या खाऊ बनवून देत असत. पू. अम्मा सेवाकेंद्रात रहात होत्या, तरीही त्यांचे सर्व नातेवाइकांशी अतिशय सौहार्दपूर्ण संबंध होते. त्यांच्यापैकी अनेक जणांनी अम्मांचे सेवाकेंद्रात रहाण्याबाबत पूर्ण समर्थन केले नव्हते, तरीही अम्मांनी सर्वांशी चांगले संबंध ठेवले. अम्मांच्या प्रेमळ आणि इतरांची काळजी घेण्याच्या वृत्तीमुळे त्या सर्वांच्या ‘अम्मा’ बनल्या.

४. प.पू. गुरुदेवांप्रती भाव

पू. (कै.) कैमलआजी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना अल्प वेळाच भेटल्या होत्या; मात्र प.पू. गुरुदेवांनी पू. अम्मांना साधनेविषयी जे सांगितले, ते पू. अम्मांच्या मनात खोलवर रुजले होते. प.पू. गुरुदेव हे पू. अम्मांचे केंद्रबिंदू होते.

५. पू. अम्मांनी देहत्याग केल्यावर  साधकाला आलेल्या अनुभूती

अ. अम्मांनी देहत्याग केल्यानंतर मला त्यांच्याकडे पाहून चांगले वाटत होते. ‘त्या झोपल्या आहेत’, असे मला वाटत होते.

आ. तेव्हा मला वातावरणात हलकेपणा जाणवत होता.’

– श्री. सुदीश पुथलत (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ६४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.८.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक