छत्रपती संभाजीनगर येथे हिंदु जनआक्रोश मोर्चा आणि ठिय्या आंदोलन !
|
छत्रपती संभाजीनगर – शहरात ३ दिवसांपूर्वी धर्मांध कासीम पठाण याच्या जाचाला कंटाळून पूजा पवार या १६ वर्षीय हिंदु तरुणीने आत्महत्या केली. गेल्या अनेक वर्षांपासून कासीम हा पूजाला त्रास देत होता. या घटनेच्या निषेधार्थ आणि धर्मांध कासीम याला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी २१ ऑगस्ट या दिवशी येथील ‘हर्सुल टी पॉईंट’ येथे हिंदु जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला, तसेच या वेळी ठिय्या आंदोलन करण्यात आले. बहुसंख्य हिंदू या मोर्चात सहभागी झाले होते.
‘पूजाला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी’, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. त्यात ७ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे; पण पोलिसांनी केवळ दोघांनाच अटक केली आहे. मोकाट असलेल्या उर्वरित धर्मांध आरोपींनी आता पूजाच्या कुटुंबियांना धमक्या देण्यास प्रारंभ केला आहे. त्यांनी तिच्या घरासमोर येऊन ‘आज जेल, कल बेल, फिर वही पुराना खेल’, असे म्हणत चाकू अन् तलवार दाखवून धमकी दिली. या प्रकारामुळे पवार कुटुंबीय दहशतीखाली आहे.
पूजाच्या कुटुंबियांना धर्मांधांकडून मारहाण होण्याची भीती !
या प्रकरणी पूजाच्या कुटुंबियांनी सांगितले की, यातील काही लोक गुन्हेगार प्रवृत्तीचे आहेत. ते चाकू, तलवार घेऊन आले आणि धमक्या देऊन गेले. मुलीच्या निधनामुळे घरात नातेवाईक आहेत; परंतु नातेवाईक गेल्यावर ते आमच्यावर आक्रमण करतील, अशा दहशतीमध्ये पूजाचे कुटुंब आहे. (पूजाच्या कुटुंबियांना धर्मांधांकडून धमक्या मिळत असतांना पोलीस काय करत आहेत ? धर्मांधांचे असे धाडस कसे होते ? – संपादक)
जटवाडा रस्त्यावर ठिय्या आंदोलन !
पूजा पवारच्या आत्महत्या प्रकरणातील पसार आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी जटवाडा परिसरातील ग्रामस्थांनी २० ऑगस्ट या दिवशी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत ‘ठिय्या आंदोलन’ केले. या वेळी माजी उपमहापौर विजय औताडे आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलकांच्या मागण्या जाणून घेण्यासाठी हर्सूल ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळ घटनास्थळी आल्या. त्यांनी आरोपींना लवकर अटक करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
संपादकीय भूमिकाधर्मांध अशी धमकी देतात यावरून महाराष्ट्रात पाकिस्तानप्रमाणे स्थिती झाल्याचे चित्र आहे ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात धर्मांधांचे असे धाडस होणे, हे पोलिसांना लज्जास्पद ! |