छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी सरकारने ‘राष्ट्रीय सुट्टी’ घोषित करण्याविषयीची मोहीम
‘भारत मुसलमान राष्ट्र झाले नाही याचे कारण, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज! त्यांची सर्वांत मोठी कामगिरी, म्हणजे ते मोगलांच्या विरोधात उभे राहिले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकानंतर जवळजवळ १४४ वर्षे मोगलांची आक्रमणे होत असूनही त्यांच्या विरोधात मराठी साम्राज्य टिकून राहिले अन् त्यांनी मोगलांना कमकुवत केले. इतर अनेक राज्ये मोगलांच्या अत्याचाराला फसलेली असतांना छत्रपती शिवाजी महाराज यांची ही कामगिरी खरोखरच श्रेष्ठ आहे. भारताच्या इतिहासाच्या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वारशाला महत्त्व आहे, यात संशय नाही. त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये त्यांची जयंती साजरी केली पाहिजे. ‘शासनाने १९ फेब्रुवारी हा दिवस ‘हिंदवी स्वराज्य अभियान’ म्हणून घोषित करावा, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देशाविषयीच्या असीम त्यागामुळे या दिवशी राष्ट्रीय सुट्टी घोषित करावी’, अशी आम्ही मागणी करत आहोत.
‘शिवजयंती’ला सुट्टी घोषित करण्याचे आणि ‘हिंदवी स्वराज्य अभियान दिवस’ साजरा करण्याचे महत्त्व ! |
१. राष्ट्र संस्कृतीचे शिक्षण
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची राष्ट्रीय सुट्टी घोषित केल्यानंतर पालक आपल्या मुलांना छत्रपती शिवरायांच्या जीवनाविषयी सांगून त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करू शकतील. मुलांना राष्ट्राविषयीचा अभिमान बाळगण्यास प्रोत्साहन देऊ शकतील. शाळा, महाविद्यालये आणि कार्यालये येथे छत्रपती शिवरायांना आदरांजली वाहिल्याने त्यांच्या वारशाला राष्ट्रीय आणि जागतिक मान्यता मिळेल.
२. गोरक्षण आणि पृथ्वीचे संवर्धन
छत्रपती शिवाजी महाराज यांनी गायींचे रक्षण आणि निर्सगाला महत्त्व देऊन संवर्धन केले. त्यांनी केलेले यांविषयीचे कार्य हे आजच्या काळात संस्कृती आणि पर्यावरण संवर्धनासाठी आदर्श अन् प्रत्येकाला गोरक्षण आणि पर्यावरण संवर्धन करावे, यांसाठी प्रोत्साहन मिळेल.
३. नौदल आणि लष्कर यांच्याविषयी प्रेरणा
छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्याच्या रक्षणासाठी उत्तम प्रकारचे नौदल आणि लष्कर स्थापन केले होते. छत्रपती शिवराय यांच्याकडून तरुणांना लष्करात भरती होण्यास प्रोत्साहन मिळेल.
४. गनिमी कावा
छत्रपती शिवाजी महाराज यांनी डोंगराळ आणि आव्हानात्मक भूप्रदेशात शोधून काढलेल्या गनिमी काव्याने लढण्याच्या पद्धतीवरून त्यांची अलौकिक बुद्धीमत्ता दिसून येते. यातून तरुणांमध्ये शौर्य अन् साधनसंपत्ती मिळवण्याचे प्रयत्न यांना बळ मिळेल.
५. महिलांचा आदर
महिलांचे संरक्षण आणि त्यांना आदर देण्याविषयी महाराजांची कठोर भूमिका सर्वांसमोर असून तो सर्वांत मोठा आदर्श आहे. यामुळे महिलांना संरक्षण आणि आदर देणे, ही मूल्ये समाजामध्ये रूजतील.
६. हिंदु संस्कृती रक्षण
छत्रपती शिवाजी महाराज यांनी मंदिरांचा जीर्णाेद्धार करणे आणि सांस्कृतिक वारशाचे रक्षण करणे यांविषयी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत. याविषयी जागृती केल्यास त्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
७. ग्रामीण विकास
छत्रपती शिवाजी महाराज यांनी आखलेल्या धोरणांतून स्फूर्ती घेऊन युवकांना ग्रामविकास आणि गाव समृद्ध करण्याविषयी चालना मिळेल.
८. नेतृत्व आणि शासन
उत्तम नेतृत्व आणि शौर्य, न्याय अन् समाजकल्याण यांना वाव देऊन शासन परिणामकारकरित्या कसे चालवावे, याचा धडा छत्रपती शिवरायांनी स्वतःच्या उदाहरणांतून दिला आहे. राष्ट्रीय सुट्टी घोषित केल्याने छत्रपती शिवरायांच्या तत्त्वांना मान दिल्यासारखे होईल.
९. राजकीय बुद्धीमत्ता
राष्ट्राच्या लाभासाठी राजकीय व्यक्तींशी सहकार्य करणे किंवा त्यांना विरोध करणे, तसेच यांतून राजकीय धोरण आणि दूरदृष्टी कशी पाहिजे ? यांविषयीचा धडा छत्रपती शिवरायांनी घालून दिला आहे.
१०. गुरु-शिष्य परंपरा
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गुरु यांच्यामधील दृढ संबंधावरून गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व लक्षात येते. यामुळे विद्यार्थ्यांना या परंपरेला मान देण्याची शिकवण मिळेल.
११. सकारात्मकेतला प्रोत्साहन
जे युवक आव्हानांना सामोरे जात आहेत त्यांच्यासाठी महाराजांचा वारसा स्फूर्तीदायक आहे. तरुणांना प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी धैर्य मिळेल.
१२. कालातीत प्रेरणा
महाराजांची महानता ही सतत प्रेरणा देणारा स्रोत आहे. त्यांची सतत आठवण रहावी, यासाठी भारतातील प्रत्येक शहर आणि तालुके येथे त्यांचा पुतळा उभारणे आवश्यक आहे. याखेरीज प्र्रत्येक घरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती किंवा छायाचित्र असले पाहिजे, ज्यामुळे त्यांना प्रार्थना करून त्यांच्यापासून प्रेरणा घेता येईल.
१३. पाश्चिमात्य कथानकांनुसार महानायक समजल्या जाणार्यांवर मात करता येणे
पाश्चिमात्य कथानकांनुसार सुपरमॅन, बॅटमॅन यांसारख्या महानायकांना महत्त्व दिले जाते; परंतु ते काल्पनिक आहेत. पाश्चिमात्य जगातील कृत्रिम व्यक्तीमत्त्वांचे अनुकरण करण्यापेक्षा आपल्या देशातील ऐतिहासिक व्यक्तींचे आदर्श ठेवण्यास युवकांना प्रोत्साहन देण्याविषयी आमची मोहीम आहे.
१४. सरकारी पाठिंबा आणि सहभाग
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी घोषित करून सरकार महत्त्वाची भूमिका घेऊ शकते. याखेरीज महाराजांच्या योगदानाविषयी देशभर शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याला पाठिंबा देऊ शकते. अशा प्रकारे प्रयत्न केल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा देशभरात पोचून त्यांना मान दिला जाईल.
निष्कर्ष |
छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनचरित्र हा प्रत्येक भारतियासाठी प्रेरणा आणि मार्गदर्शन देणारा अमूल्य स्रोत आहे. त्यांनी आमच्या समोर उदाहरण म्हणून ठेवलेल्या गुणांची ओळख करून घेणार आहोत, तसेच या राष्ट्रपुरुषाला केवळ मान देणार नसून स्वतःचे जीवनही समृद्ध करणार आहोत. महत्त्वाचे म्हणजे पालकांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली कामगिरी आणि त्यांची महानता त्यांच्या पुढच्या पिढीला सांगावी, यांवर या मोहिमेद्वारे भर देण्यात आला आहे. यामुळे या महान व्यक्तीमत्त्वाच्या वारशातून पुढील पिढीमध्ये राष्ट्राभिमान आणि एकता येण्यास प्रोत्साहन मिळेल.
– श्री. सी.डी. चव्हाण, भाग्यनगर, तेलंगाणा.
महान राष्ट्रीय व्यक्तींसाठी देशभर सुट्टी घोषित करण्याची मागणी करणारे उद्योजक सी.डी. चव्हाण !छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एका भक्ताला नेहमीच छत्रपती शिवरायांना श्रद्धांजली वहाण्याची इच्छा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वारशाविषयी त्याला महत्त्वाचे योगदान देण्याची इच्छा आहे. ही महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी घोषित करावी, हे सूत्र मांडण्याची संकल्पना त्यांना सुचली आहे. असे हे छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे व्यक्तीमत्त्व म्हणजे श्री. सी.डी. चव्हाण ! ते स्वतः एक उद्योजक आहेत. पुष्कळ परिश्रम, निर्धार आणि शिस्त यांमुळे त्यांनी या क्षेत्रात मोठे यश मिळवले आहे. ते नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रशंसा करणारे असून राष्ट्रासाठी महत्त्वाचे कार्य करण्याची त्यांची इच्छा आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज या आदरणीय नेत्याला मान दिला जावा आणि त्याची ओळख सर्वांना व्हावी’, या दृष्टीने श्री. सी.डी. चव्हाण यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती या दिवशी ‘राष्ट्रीय सुट्टी’ म्हणून घोषित करावी’, ही संकल्पना मांडली आहे. श्री. सी.डी. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली इतर ४ सदस्यांनी १० फेब्रुवारी २०२३ या दिवशी याविषयीच्या मोहिमेला प्रारंभ केला. तेव्हापासून या मोहिमेला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत भारतातील १ लाख निष्ठावंत लोकांनी या मोहिमेला पाठिंबा दर्शवला आहे. |
अभियानात सहभागी व्हा !
या मोहिमेला प्रत्येक भारतीय नागरिकाने मत देऊन पाठिंबा द्यावा. यासाठी ०७९४१०५५७७९ या क्रमांकावर संपर्क करून किंवा www.voteforshivajijayanti.com अथवा www.shivajimaharajfoundation.com या संकेतस्थळाला भेट देऊन त्यावर मत नोंदवता येईल. ‘या मोहिमेला पाठिंबा द्यावा’, असे आवाहन मी प्रत्येक भारतीय नागरिकाला करत आहे.’ –
– श्री. सी.डी. चव्हाण
मोहिमेची फलनिष्पत्ती
१. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीसाठी दिली जाणारी ‘एक्स’ माध्यमावरील ‘हॅशटॅग’ मतांची संख्या ३ कोटीपर्यंत पोचली आहे.
२. शिवजयंतीला राष्ट्रीय सुट्टी द्यावी, यासाठी १ लाख लोकांनी मत दिले आहे.
३. सिरूरचे भाजप आमदार पलवई हरिश बाबू आणि अदिलाबादचे भाजप आमदार पायल शंकर यांनी शिवजयंतीच्या मोहिमेला पाठिंबा द्यावा, याविषयीचे सूत्र विधानसभेत मांडले.
४. या मोहिमेमुळे तेलंगाणा सरकारने मुसलमानांच्या ‘शब ए मिराज’ उत्सवासाठी सुट्टी देण्याविषयी घेतलेला निर्णय स्थगित ठेवण्यात आम्हाला यश मिळाले.
– श्री. सी.डी. चव्हाण