Assaulting Maulana : बागलकोट (कर्नाटक) येथे मौलानाला मारहाण : २ तरुणांना अटक

(मौलाना म्हणजे इस्लामचे अभ्यासक)

बागलकोट (कर्नाटक) – नवनगर सेक्टर क्रमांक ४ मधील भाजी बाजारातील  दुकान उघडण्याच्या कारणावरून झालेला किरकोळ वाद विकोपाला गेल्यानंतर मौलानाला मारहाण केल्याच्या प्रकरणी २ युवकांना अटक करण्यात आली. कार्तिक, प्रीतम, आणि नागराज यांनी आक्रमण केल्याचा आरोप आहे.

आक्रमणाच्या घटनेनंतर मुसलमान समाजाच्या प्रमुख व्यक्ती रात्री नवनगर पोलीस ठाण्याच्या समोर जमले आणि संताप व्यक्त केला. या घटनेमुळे काही काळ नवनगर पोलीस ठाण्यासमोर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी मुसलमानांना शांत करत कार्तिक आणि प्रीतम यांना अटक केली. पोलीस नागराज याचा शोध घेत आहेत.