Girls Abused : कृष्णागिरी (तमिळनाडू) येथे खोट्या ‘एन्.सी.सी.’ शिबिरात १३ मुलींचा लैंगिक छळ

२ शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यासह ११ जण अटकेत

कृष्णागिरी (तमिळनाडू) – येथे एका खासगी शाळेत खोट्या ‘नॅशनल कॅडेट कॉर्प्स’ (एन्.सी.सी.) शिबिरात एका मुलीवर लैंगिक अत्याचार झाला असून किमान १२ इतर मुलींना लैंगिक शोषण सहन करावे लागले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी शिबिराचे आयोजक, शाळेचे मुख्याध्यापक, २ शिक्षक आणि एका पत्रकारासह ११ जणांना अटक करण्यात आली आहे.

१. शाळेच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या सभागृहात मुलींची व्यवस्था करण्यात आली होती, तर मुलांना तळमजल्यावर ठेवण्यात आले होते. शिबिराच्या देखरेखीचे काम कोणत्याही शिक्षकांकडे सोपवले नव्हते. आमीष दाखवून सभागृहातून बाहेर नेऊन लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप मुलींनी केला आहे.

२. शाळेच्या अधिकार्‍यांनी लैंगिक अत्याचारांची माहिती होती; मात्र पोलिसांना कळवण्याऐवजी त्यांनी हा विषय दडपण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांना ‘या घटनेकडे गांभीर्याने पाहू नये’ असे सांगण्यात आले होते’, असे जिल्हा पोलीस अधीक्षक पी. तंगदुराई यांनी माध्यमांना सांगितले.