Bharat Bandh : आरक्षणातील कोट्याच्या विरोधातील ‘भारत बंद’ला काही राज्यांतच प्रतिसाद
आंदोलनकर्त्यांनी रेल्वे बंद, रस्ता बंद आणि जाळपोळ करून जनतेला वेठीस धरले !
नवी देहली – अनुसूचित जाती आणि जमाती यांच्या कोट्यामध्ये कोटा ठेवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात २१ ऑगस्ट या दिवशी दलित आणि आदिवासी संघटनांनी ‘भारत बंद’ची हाक दिली होती. त्याला बहुजन समाज पार्टी, राष्ट्रीय जनता दल, वंचित बहुजन आघाडी यांच्यासह अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला. या बंदला काही ठिकाणीच प्रतिसाद मिळाला, तर देशात अन्यत्र जनतेला ‘आज बंद पाळला जाणार आहे’, हेही ठाऊक नव्हते. बिहार, झारखंड आणि राजस्थान या राज्यांमध्ये काही प्रमाणात बंदचा प्रभाव दिसून आला. येथे रेल्वे बंद, रस्ता बंद यांसारखी आंदोलने, तसेच काही ठिकाणी जाळपोळ करण्यात आली.
‘Bharat Bandh’ called against the reservation quota received a response only in a few states.
🛑The protesters disrupted railways, blocked roads, and resorted to arson, holding the public hostage!
👉The Supreme Court has already ordered that fines be collected from those… pic.twitter.com/QgDJav8fKs
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 21, 2024
संपादकीय भूमिकाबंद पाळणार्यांकडून दंड वसूल करण्याचा आदेश यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्याची कार्यवाही का होत नाही ? बंद पुकारून देशाची हानी करणार्यांना कारागृहातच डांबले पाहिजे ! |