Muslims Leaving Islam : जगभरातील मुसलमान सोडत आहेत त्यांचा धर्म !
|
नवी देहली – ‘प्यू रिसर्च सेंटर’च्या वर्ष २०१९ च्या अहवालानुसार अमेरिकेतील अनुमाने २३ टक्के प्रौढांनी, म्हणजे १३ लाख मुसलमानांनी इस्लाम धर्म सोडला आहे. या प्रौढांपैकी अनुमाने ७ टक्के लोकांनी सांगितले की, ते इस्लामच्या शिकवणीशी सहमत नाहीत.
१. जर्मनीमध्ये प्रतिवर्ष १५ ते २० सहस्र लोक सोडतात इस्लाम !
वर्ष २०२० मध्ये जर्मन वृत्तपत्र ‘डाय वेल्ट’च्या एका अहवालात असे म्हटले आहे की, प्रतिवर्षी जर्मनीमध्ये अनुमाने १५ ते २० सहस्र लोक इस्लाम धर्माचा त्याग करत आहेत.
२. यूकेमध्ये प्रतिवर्षी १ लाख लोक सोडतात इस्लाम !
युनायटेड किंगडम्, म्हणजेच यूकेमधील अनेक लोक इस्लाम धर्माचा त्याग करत आहेत. ‘टाइम्स’ वृत्तपत्रानुसार, प्रतिवर्षी अनुमाने १ लाख लोक इस्लाम धर्म सोडतात.
Mu$l!ms around the world are renouncing their religion. – Pew Research Report
1.3 million people left I$l@m in the United States.
Globally, the Christians and the Mu$l!ms are either abandoning their religion by themselves, or are becoming atheists.
Hindus on the other hand are… pic.twitter.com/5xxoXQtgvN
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 21, 2024
३. इतकेच नाही, तर मुसलमान देश इराणमध्येही मुसलमान इस्लाम सोडून इतर धर्म स्वीकारत आहेत. इराणच्या एका धार्मिक नेत्याने वर्ष २०२३ मध्ये सांगितले होते की, बख्तियारी जमातीचे लोक झोरास्ट्रियन धर्म स्वीकारत आहेत, तर अनेकांनी ख्रिस्ती धर्मही स्वीकारला आहे.
४. वर्ष १९८१ ते २०२० या कालावधीत मध्यपूर्वेतील धर्माविषयी सर्वांत मोठे सर्वेक्षण करण्यात आले. मिशिगन विद्यापिठाने केलेल्या या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, ट्युनिशिया, मोरोक्को आणि इराक यांसारख्या मुसलमान देशांमध्ये इस्लामचे अनुसरण करणारे लोक आता स्वतःला नास्तिक म्हणवू लागले आहेत.
५. मुसलमान देशांमध्ये जर कुणी इस्लाम सोडला, तर त्याच्यासाठी कठोर शिक्षा आहे; म्हणूनच बरेच लोक त्यांच्या वागणुकीतून ते मुसलमान असल्याचे दाखवत असले, तरी ‘प्रत्यक्षात ते आता मुसलमान राहिले आहेत’, असे ठामपणे सांगता येत नाही.
लेबनॉनमधील अनुमाने ४३ टक्के मुसलमान घरात इस्लामचे पालन करत नाही !
लेबनॉनमधील अनुमाने ४३ टक्के लोकांनी मान्य केले की, ते घरात किंवा त्यांच्या वैयक्तिक ठिकाणी इस्लामचे पालन करत नाहीत. ‘अरब बॅरोमीटर’ या संशोधन करणार्या संस्थेने अनुमाने २५ सहस्र लोकांशी बोलून हा अहवाल बनवला होता.
संपादकीय भूमिकाभारतात हिंदूंचे आमीष दाखवून, फसवून किंवा बलपूर्वक धर्मांतर केले जाते; मात्र जगभरात ख्रिस्ती आणि इस्लाम स्वतःहून सोडण्याची किंवा नास्तिक होण्याची संख्या प्रतिदिन वाढत आहे. हिंदु धर्मांत कुणी कधी स्वतःहून धर्म सोडत नाही, यावरून त्याचे महत्त्व लक्षात येते ! |