कुठून येते या नराधमांना हे बळ ?
कोलकाता (बंगाल) येथील पदव्युत्तर शिक्षण घेणार्या महिला आधुनिक वैद्यावर बलात्कार होऊन तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. असे असतांना मेहताब के. या मुसलमानाने त्या महिलेविषयी अश्लाघ्य विधान केले आहे. त्यावर पणजी (गोवा) श्री. प्रसन्न शिवराम बर्वे यांनी केलेले वास्तविकता दर्शवणारे भाष्य येथे देत आहोत.
ती अत्याचारात मेली बिचारी. आरोपी पकडले जातील. कदाचित् आरोपीला शिक्षाही होईल; पण त्या व्यक्तीने व्यक्त केलेली प्रतिक्रिया वाचण्याआधी आम्हाला मरण का आले नाही ? त्या मुलीसारखे ? असे नराधम अशाच एका मुलीची वाट पहात मोकाट फिरत आहेत. फार फार तर ‘अकाऊंट डिलीट’ (सामाजिक माध्यमावरील खाते नष्ट) केले जाते. शिक्षा होतेच, असे नाही. जरी शिक्षा झाली, तरी अशा मनोवृत्तीच्या लोकांना जरब बसावी, अशी ती दिसतही नाही.
अशा पोरींच्या अत्याचारावर मेणबत्त्यांचे अनेक कारखाने चालत रहातील. ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणार्या इसमास खालच्या न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा, ‘५ वेळा देवाचे नाव घेतो’; म्हणून वरचे न्यायालय ती शिक्षा रहित करून जन्मठेपेत पालटत असेल, तर जरब बसेलच कशी ? होता होईल तितक्या लवकर एकदाचे डोळे कायमचे मिटावेत, हीच इच्छा !
– श्री. प्रसन्न शिवराम बर्वे, पणजी, गोवा. (श्री. बर्वे यांच्या फेसबुकवरून साभार)
संपादकीय भूमिका…वरचे न्यायालय कठोर शिक्षा रहित करून ती जन्मठेपेत पालटत असेल, तर जरब बसेलच कशी ? |