गोकुळाष्टमीच्या निमित्ताने शाहूपुरी येथील राधाकृष्ण मंदिरात विविध कार्यक्रमांना प्रारंभ !
कोल्हापूर – शाहूपुरी येथील राधाकृष्ण मंदिर येथे गोकुळाष्टमीच्या निमित्ताने २० ऑगस्टपासून ‘पौर्णिमा उपासना’ करून विविध कार्यक्रमांना प्रारंभ झाला. २१ ऑगस्टला सायंकाळी ५ ते ७ स्तोत्र गायन, २२ ऑगस्टला राधाकृष्ण स्वाध्याय मंडळाचे भजन, २३ ऑगस्टला सकाळी १० ते सायंकाळी ७ अखंड जप, २४ ऑगस्टला सकाळी १० ते सायंकाळी ७ विनामूल्य आरोग्य शिबिर आणि सायंकाळी ५ ते ७ कृष्णगीते, २५ ऑगस्टला रजनीबाईंची गाणी, २६ ऑगस्ट म्हणजे कृष्णाजन्माष्टमीला रात्री १० ते १२.३० श्रीकृष्ण जन्मकाळ, तर २७ ऑगस्टला दुपारी ४ ते सायंकाळी ६ पर्यंत दहीहंडी आणि गोपाळकाला होईल. तरी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन राधाकृष्ण मंदिर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
२४ ऑगस्टला ‘रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सिटी’ यांच्या सहकार्याने होणार्या विनामूल्य वैद्यकीय चिकीत्सा शिबिरात दंत चिकित्सा, नेत्रपडताळणी, स्त्रीरोग पडताळणी, आरोग्य पडताळणी, लहान मुलांची पडताळणी, रक्त पडताळणी, मूत्ररोग पडताळणी, हाडांचे विकार पडताळणी करण्यात येणार आहे. पडताळणी झाल्यावर विनामूल्य औषधेही मिळणार आहेत. तरी अधिकाधिक रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे.