सामाजिक सलोखा राखण्यासाठी मुसलमानेतरांनी मशिदींची माहिती जाणून घेण्यासाठी सोलापुरात उपक्रम !
सोलापूर – येथील चार हुतात्मा चौक समोरील हाजी हजरत खान मशीद या ठिकाणी मशिदीची अन्य धर्मियांना माहिती होण्यासाठी एक उपक्रम आयोजित करण्यात आला होता. ही मशीद १०५ वर्षे जुनी आहे. ‘जमीयत ए अहले हदिस’ या संघटनेच्या वतीने प्रत्येक वर्षी हा उपक्रम राबवण्यात येतो. उपक्रमाचे उद्घाटन सोलापूरच्या अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
मशीद म्हणजे काय असते ? त्या ठिकाणी नेमके काय चालते ? अजान, वजू, नमाज म्हणजे काय ? आदी प्रश्नांची उत्तरे या उपक्रमातून देण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. या प्रश्नांची उकल व्हावी, तसेच सोलापुरात सामाजिक सलोखा अबाधित रहावा, यासाठी ‘मेक इंडिया बेटर कँपेन’च्या अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संपादकीय भूमिकायाऐवजी ‘गझवा-ए-हिंद’ (भारताचे इस्लामीकरण), ‘काफिरांच्या विरोधात जिहाद’, ‘दार्-उल्-इस्लाम’ (भूमी इस्लामच्या अधिपत्याखाली आणणे) आदी संज्ञांचा अर्थ सांगून आजचा मुसलमान समाज हे मानीत नाही, हे सोदाहरण दाखवून मुसलमानेतरांचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. यानेच सामाजिक सलोखा निर्माण होईल, हे आयोजकांना कोण सांगणार ? |