भारतीय गुंतवणूकदारांनी ‘हिंडेनबर्ग’, आंतरराष्ट्रीय उद्योगपती जॉर्ज सोरोस, काँग्रेसचे राहुल गांधी आणि त्यांच्या टोळीचा केला सणसणीत मुखभंग !

‘भारतात आम्ही काहीतरी मोठा धमाका करणार’, अशी ‘टीझर पोस्ट’ (संक्षिप्त भागाचे लिखाण) सामाजिक माध्यमांवर प्रसारित करून भारतीय शेअर (समभाग विक्री) बाजार कोसळवण्याचे सगळे नेपथ्य सिद्ध करण्यात आले होते. ‘एक ‘शॉर्ट सेलर’ (शेअर्सच्या किमतीत घट होण्याचे अनुमान वर्तवणारे) असलेले ‘हिंडेनबर्ग’ यात पैसे कमावणार आणि भारतीय गुंतवणूकदारांचे पैसे बुडणार’, हे स्पष्ट होते. असे असूनही राहुल गांधी आणि ‘नमो’ रुग्णांची (पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधकांची) टोळी जिभल्या चाटू लागली होती. त्यांना हिंडेनबर्गला पैसे मिळावेत, यात अधिक रस होता कि भारतीय गुंतवणूकदारांना बुडवण्यात हे त्यांनाच ठाऊक ?

१. …पुन्हा भारताच्या दिशेने बघण्याचे हिंडेनबर्गचे धाडस होणार नाही !

एक गोष्ट मात्र नक्की, ‘या धमाक्यानंतर अदानी आणि त्यांच्याद्वारे मोदींच्या दिशेने तंगडी वर करता येणार,’ या आनंदात हे दंग होते. शनिवारी तथाकथित धमाका केला की, सोमवारी शेअर बाजारात ‘ब्लॅक मंडे’ (काळा सोमवार) होणार आणि ‘मोदी अन् भारत यांचे वाभाडे निघणार’, या हेतूने ‘हिंडेनबर्ग’ने एक फुसका फटाका फोडला. लगेच राहुल गांधी आणि त्यांच्या सदस्यांनी संसदेत गदारोळ चालू केला. अदानींविरुद्ध ट्वीट करण्याचे दरही ठरले. ‘एका जुगारी आस्थापनावर विसंबून आपण भारतीय अर्थव्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर शंका उपस्थित करतो आहोत’, याची त्यांना अर्थातच तमा नव्हती; पण १२ ऑगस्ट २०२४ या दिवशी भारतीय गुंतवणूकदारांनी त्यांचे थोबाड असे फोडले की, पुन्हा भारताच्या दिशेने बघण्याचे हिंडेनबर्गचे धाडस होणार नाही. या दिवशी बाजार कोसळला, तर नाहीच; पण १९२ अंशांनी वर गेला. हे सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे मोदी आणि भारतीय अर्थव्यवस्था यांवर असलेल्या प्रगाढ विश्वासाचेच प्रतीक आहे.

२. भारतीय एकसंध राहिले, तर ते अराजकवादी मनसुबे हाणून पाडू शकतात !

श्री. अभिजित जोग

‘भारत असाच एकसंध आणि अभंग राहिला, तर ‘डीप स्टेट’, जिहादी आणि साम्यवादी यांच्या अभद्र युतीचे सगळे अराजकवादी मनसुबे हाणून पाडेल’, असा विश्वास दृढ करणारा १२ ऑगस्ट हा दिवस होता. (‘डीप स्टेट’ म्हणजे सरकारी अधिकारी आणि खासगी संस्था यांच्या गुप्त जाळ्यांचा संदर्भ देते जी कुणासही उत्तरदायी न रहाता सरकारी धोरणावर प्रभाव टाकते.)

लेखक : श्री. अभिजित जोग, ‘असत्यमेव जयते’ आणि ‘जगाला पोखरणारी डावी वाळवी’ या पुस्तकांचे लेखक, पुणे.