मानवी साहाय्यापेक्षा ईश्वराचे साहाय्य महत्त्वाचे !
स्वामी विवेकानंद यांची शिकवण
तथाकथित धनिकांवर विश्वास ठेवू नका, जिवंत असण्यापेक्षा ते मेलेलेच अधिक चांगले आहे. तुमच्यापैकी जे नम्र आहेत, जे शांत स्वभावाचे आहेत; पण जे श्रद्धासंपन्न आहेत, त्यांचीच काही आशा आहे. ईश्वरावर श्रद्धा असू द्या.
कुणाकडून साहाय्याची अपेक्षा करू नका. सर्व प्रकारच्या मानवी साहाय्यापेक्षा ईश्वर अनंतपटीने मोठा नाही का ? पवित्र बना, शुद्ध व्हा, प्रभुवर श्रद्धा असू द्या ! त्याच्यावरच सर्वदा अवलंबून रहा, म्हणजे तुम्ही नेहमी उचित मार्गावर रहाल; मग कोणतीही गोष्ट तुमचा विरोध करू शकणार नाही.
(साभार : ‘स्वामी विवेकानंद म्हणतात’, रामकृष्ण मठ, नागपूर.)