बोरिवली येथे हिंदु जनआक्रोश मोर्चात दीड सहस्रांहून अधिक हिंदूंची उपस्थिती !
मुंबई – बांगलादेशातील हिंदूंवर होणार्या अत्याचारांच्या विरोधात हिंदु नववर्ष स्वागत समिती, बोरिवलीच्या वतीने १८ ऑगस्ट या दिवशी बोरिवली येथे हिंदु जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या वेळी सकल हिंदु समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. दीड सहस्रांहून अधिक हिंदू येथे जमले होते. त्यात महिलांचाही समावेश होता. विश्व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्रीराज नायर, विश्व संवाद केंद्रचे कोकण प्रांत संपादक पराग नेरूरकर, भाजपचे उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष गणेश खंणकर यांनी जमलेल्या नागरिकांना मार्गदर्शन केले. भाजपचे आमदार सुनील राणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुंबई महानगर सहकार्यवाह विलास भागवत यांनीही मोर्चात सहभाग घेतला होता.