राज्यातील १७ सहस्र ४७१ पोलीस पदांसाठी १६ लाख ८८ सहस्र ७८५ अर्ज !
मुंबई – राज्यात पोलीस दलातील १७ सहस्र ४७१ पदांसाठी भरती प्रक्रिया चालू आहे. यासाठी तब्बल १६ लाख ८८ सहस्र ७८५ अर्ज प्राप्त झाले आहे. यामध्ये ३ सहस्र ९२४ पदे महिलांसाठी राखीव आहेत. या पदांसाठी २ लाख ७८ सहस्र ८२९ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये ९ सहस्र ५९५ शिपाई, १ सहस्र ६८६ चालक आणि १ सहस्र ८०० कारागृहातील शिपाई या पदांची भरती प्रक्रिया चालू आहे.