फडणवीस सगेसोयरेचे आरक्षण का देत नाहीत ? – मनोज जरांगे पाटील
जालना – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे, तरी ते सगेसोयरेचे आरक्षण का देत नाहीत ? स्वत:विषयी गैरसमज पसरवला जात असल्याचा आरोप फडणवीस करत आहेत; मात्र तो आरोप चुकीचा आहे. मराठा समाजाचे आरक्षण हे देवेंद्र फडणवीस यांनीच रोखले आहे, तसे नसते, तर सगेसोयरेच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते, अशी टीका मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी १९ ऑगस्ट या दिवशी पत्रकारांशी बोलतांना केली.