महंत रामगिरी महाराजांना ‘झेड प्लस’ सुरक्षा द्यावी !
महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाची मागणी
मुंबई – महंत रामगिरी महाराजांना देण्यात आलेली सुरक्षा तुटपुंजी असून त्यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाने केली आहे.
महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प प्रकाश महाराज जवंजाळ म्हणाले, ‘‘काही लोकांनी रामगिरी महाराजांचे वक्तव्य वादग्रस्त बनवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या वक्तव्याला विरोध करणार्या लोकांचा आम्ही निषेध करतो. महाराज मंडळींना सत्य समाजासमोर मांडण्याचा अधिकार आहे.’’