सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी ते आसनस्थ असलेल्या रथात साधिकेला विठ्ठलाचे दर्शन होणे
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सव सोहळ्याच्या वेळी त्यांना पहाण्याचा ध्यास लागणे आणि बाहेर ऊन असूनही त्याचे काहीच न वाटणे
‘११.५.२०२३ या दिवशी आम्ही सर्व साधक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ब्रह्मोत्सव सोहळा पहाण्यासाठी पटांगणात बसलो होतो. तेव्हा मला ‘कधी सोहळा चालू होतो आणि मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना पहाते’, असे सतत वाटत होते. मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना पहाण्याचा ध्यास लागला होता. बाहेर पुष्कळ ऊन असूनही मला त्याचे काहीच वाटत नव्हते. माझे मन कृतज्ञतेने भरून आले.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आसनस्थ झालेला रथ पटांगणात येत असतांना मला ‘तो रथ वैकुंठलोकातून हळूहळू खाली भूमीवर येत आहे’, असे वाटत होते. तेव्हा मला सूक्ष्मातून दिसले, ‘रथात साक्षात् विठ्ठल उभा आहे. मी पंढरपूरला असून वारीतील रिंगण (टीप) चालू आहे.’
(टीप – रिंगण : सहभागी सर्व वारकरी वर्तुळात उभे राहून विठ्ठलनामाचा गजर करतात. तेव्हा टाळ, मृदुंग अशी वाद्ये वाजवली जातात. हा गजर चालू असतांना अश्व रिंगणाच्या मधून धावतो आणि त्याच्या मागे वारकरी धावतात.)
३. मला सोहळ्याच्या ठिकाणी सर्वत्र चैतन्य जाणवत होते. माझे देहभान हरपून गेले होते. मी सोहळ्याशी पूर्णपणे समरस झाले होते. मला पुष्कळ आनंद मिळाला. मी हा सोहळा कधीच विसरू शकत नाही.
मला हे सर्व अनुभवण्याची संधी दिल्याबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. वत्सला तुकाराम कोकाटे (वय ७० वर्षे), वडूज, जिल्हा सातारा. (८.१२.२०२३)
|