पू. पृथ्वीराज हजारे यांच्या संदर्भात साधिकेला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
१. ‘पू. पृथ्वीराज हजारे यांच्या देहातून पांढरा प्रकाश बाहेर पडत आहे’, असे दिसणे
‘जानेवारी २०२४ मध्ये मी एकदा रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात गेले होते. तेव्हा मला पू. पृथ्वीराज हजारेकाका (सनातनचे २५ वे संत, वय ६५ वर्षे) हे समोरून येतांना दिसले. तेव्हा त्यांच्या ‘देहातून वीज चमकावी त्याप्रमाणे पांढरा प्रकाश बाहेर पडत आहे’, असे मला दिसले. त्यानंतर काही क्षण मी त्यांच्याकडे बघतच राहिले. मला अनुमाने १० ते १२ सेकंद हा प्रकाश स्थुलातून दिसत होता. त्यानंतर १२.३.२०२४ या दिवशी पू. हजारेकाका भोजनकक्षात महाप्रसाद घेत होते. तेव्हा मला अकस्मात् तसाच प्रकाश त्यांच्या देहातून सतत बाहेर पडत आहे’, असे स्थुलातून दिसत होते.
२. ‘पू. हजारेकाकांच्या सत्संगात असतांना मला गारवा जाणवतो’, अशी अनुभूती मला काही वेळा आली आहे.
३. पू. हजारेकाकांना पाहिल्यावर शांतीची अनुभूती येणे
पू. हजारेकाकांना पाहिल्यावर माझ्या मनाला शांत वाटते. त्यांच्याकडून ‘शांतीची स्पंदने प्रक्षेपित होत आहेत’, असे मला दोन वेळा जाणवले.
४. ‘पू. पृथ्वीराज हजारेकाका सद्गुरुपदावर विराजमान झाले असावेत’, असा विचार माझ्या मनात आला.’
– होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी, नागेशी, फोंडा, गोवा. (२६.३.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |